मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्राचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे सलग चौदा वर्षांची परंपरा अखंडितपणे सुरू ठेऊन देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माढेश्वरी अर्बन बँक माढा, यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या मोफत नेत्राचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व विकासप्रीय आमदार मा.श्री.बबनरावजी दादा शिंदे यांचे शुभ हस्ते तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.संजयमामा शिंदे,मा.डॉ.पद्मश्री तात्याराव लहाने, मा.डॉ.रागिणीताई पारेख,माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मा.सौ.मिनालताई साठे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा.श्री.रणजित भैय्या शिंदे, माढा पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री.विक्रम दादा शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी माढा तहसीलदार मा.श्री.राजेश चव्हाण,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती मा.श्री.सुहास काका पाटील,माढा पोलीस निरीक्षक मा.श्री.शाम बुवा,जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे प्रमुख मा.श्री.डॉ.गणेश इंदुरकर,तालुका आरोग्य अधिकारी मा.श्री.डॉ.शिवाजी थोरात,बारामतीचे मा.श्री.मिलिंद संघवी, मा.श्री.अमर महाडिक, मा.श्री.झुंजार नाना भांगे,बँकेचे व्हॉईस चेअरमन मा.श्री.अशोक शेठ लूणावत व सर्व संचालक मंडळ,आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर्स,कर्मचारी,मुंबईहून आलेले जे जे रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स,स्टाफ,सर्व वृद्ध महिला व पुरुष रुग्ण,ग्रामस्थ,महिला भगिणी उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here