मा. विजयराज (दादा) डोंगरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मा. विजयराज (दादा) डोंगरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा..!

कामती खुर्द ता. मोहोळ येथे आज जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती मा. विजयराज (दादा) डोंगरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमात दादांना क्रेन नी हार घालून सत्कार करण्यात आला व रक्तदान कार्यक्रम आयोजित केले होते व नगरसेवक सुशील क्षीरसागर यांची मोहोळ शहर भाजपा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी मा. विजयराज दादा बोलताना म्हणाले की, खरं तर रक्ताचा पुरवठा कायमच कमी असतो त्यातच कोरोनामूळे आणखीनच रक्ताचा तुटवडा भासू लागला. या पार्श्वभूमीवर माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण रक्तदानाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आदरणीय मनोहर भाऊनी जो आपल्या सर्वांना समाजकारण करत असताना आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे त्यानुसार आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने मागच्या कोरोनाच्या काळात व त्याच्या अगोदरही आपापल्या गावामध्ये रक्तदान व इतर समाज उपयोगी कार्यक्रम करून समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच नगरसेवक सुशील क्षीरसागर बोलताना म्हणाले की, रक्तदान कार्यक्रम व माझा सत्कार केल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. माजी सरपंच संजय पाटील, सुखदेव पाटील,आमचे मित्र विठ्ठल माळी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. दादांच्या कामाचा लौकिक मी लहानपणापासून ऐकतोय.मागील लोकसभेपासून मला तो जवळून अनुभवता आला. कोणताही दुजाभाव मनात न बाळगता फक्त समाजकारण करतात व त्यांच्या जि. प. सभापती च्या कार्यकाळात त्यानी निधीच वाटप समान करून मोहोळ तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात कामे केली आहेत आणि करत आहेत. यामुळेच एक यशस्वी आणि सच्चे नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. या कार्यक्रमच्या निमित्ताने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी पार्थना करतो. तसेच माजी सभापती समता ताई गावडे व कार्यक्रम चे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी ही आपले मनोगत व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून जनशेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, मा. सभापती समताताई गावडे, भाजपा उपाध्यक्ष पांडुरंग अण्णा बचुटे,ज्येष्ठ नेते सर्जेराव दाजी, जयसिंग अवताडे, बाबासाहेब पवार,लिंगराज निकम,जनहित संघटनेचे चंद्रकांत निकम, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सुनील तात्या पाटील, महेश धुमाळ, दीपक पुजारी, युवा नेते अक्षय खताळ,दीपक गवळी, दिलीप काका गायकवाड, फंटू गोफने, सादिक भाई तांबोळी, भाजपा शहर सरचिटणीस विशाल डोंगरे,नितीन सोनटक्के सर, अमोल व्यवहारे,राहुल व्यवहारे,पत्रकार सुहास घोडके, पत्रकार महेश कुलकर्णी, विकास वाघमारे, महेश हावळे तसेच अनेक मान्यवर, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here