मा.खा.धनंजय महाडिक यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त घरगुती आटाचक्कींचे मोफत वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(महाडिक घराण्याचा दातृत्वाचा वारसा विश्वराज यांचेकडून जतन)
प्रा. संग्राम दादा चव्हाण

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

संसदरत्न खासदार श्री. धनंजय महाडिक यांच्या येत्या 15 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या 50 व्या वाढदिवसानिमित्त दर वर्षीप्रमाणे गरीब व गरजू विधवा महिलांना मोफत घरगुती आटाचक्की वाटपाचा कार्यक्रम टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील स्वर्गीय भिमरावदादा महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारक प्रांगणामध्ये पार पडला. याप्रसंगी बोलताना श्री.पांडुरंग ताटे म्हणाले की अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा स्वर्गीय भीमराव दादा महाडिक यांच्या काळापासून सुरू असून अशा उपक्रमांमधून महाडिक कुटुंबियांचं कर्तृत्व आणि दातृत्वच सिद्ध होते.याप्रसंगी भीमा परिवाराचे संघटक तथा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण तसेच संचालक श्री.अनिल गवळी उपस्थित होते.आपले मनोगत व्यक्त करताना श्री.संग्राम चव्हाण म्हणाले, “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले असले तरीही खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या सर्वच कुटुंबीयांनी सामान्य नागरिकांशी व शेतकऱ्यांशी नाळ तूटू दिलेली नसून समाजातील दीनदुबळ्या कुटुंबांविषयी मनातून खरी आस्था जपण्याचा महाडिक घराण्याचा वारसा पुढे तसाच सुरू ठेऊन अल्पावधीतच मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले व आधुनिक तरूणाईचा “आयकॉन”ठरलेले नवोदित युवानेता श्री.विश्वराज महाडिक यांनी तालुक्यात राबविलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.” यावेळी उपस्थित भीमा परिवाराचे मोहोळ तालुका शिवसेना उपाध्यक्ष श्री.संतोष चव्हाण,भाजपा उपाध्यक्ष माजी जि.प.सदस्य श्री.सुनील चव्हाण श्री.राजू बाबर,भीमराव वसेकर,श्री.बंडू शेख श्री.सिद्धेश्वर अनुसे,माजी सरपंच पोपट सोनटक्के,संजय सोनटक्के, संतोष बचुटे दीपक वाघमारे,पोपट वसेकर,बंडू अनुसे,जमीर मुजावर,सज्जन चव्हाण,पोपटराव चव्हाण,नितीन चव्हाण विश्वास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here