कारखाना बंद पाडण्यासाठीच सर्वांचे कटकारस्थान सुरू आहे:-मा.खा.धनंजय महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कारखाना बंद पाडण्यासाठीच सर्वांचे कटकारस्थान सुरू आहे:-मा.खा.धनंजय महाडिक

कोल्हापूर // प्रतिनिधी

सत्तेचा उपयोग जनतेच्या कल्याण साठी केला पाहिजे, मात्र पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक हे एफआपी थकीली म्हणून भीमा साखर कारखान्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे प्रयत्न करत आहेत. निवडणुकीच्या रणांगणात आरोप प्रत्यारोप करून मात्र एकमेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे राजकारण करू नये अशी टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केली राज्यात एकट्या ‘भीमा’ कारखान्याची एफआपी थकीत नाही. साखर उद्योगाला सावरण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, उध्दव ठाकरे केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. मात्र ही मंडळी कारखानादारी संपणयासाठी ताकद खर्ची घालत आहेत. ‘भीमा’ कारखान्यावर 22 हजार कुटुंबीयांच्या चुली अवलंबून आहेत. घाणेरडे राजकारण करून तेथील शेतकरी संपेल. कोल्हापूरच्या जनतेला थेट पाईपलाईनद्वारे शुध्द पाणी देण्याच्या नावाखाली दोन निवडणुकीत जिंकल्या. हे पाणी कोठे थांबले हे सगळ्यांना माहिती आहे. यापुढे अशा अकरा दिवाळ्या आल्या, तरी हे पाणी मिळणार नाही.

आता कोल्हापूरची जनताच नेत्यांना थेट पाईपलाईनचे पाणी पाजेल असा इशारा महाडिक यांनी दिला. लहान वयात मंत्रीपद मिळाले, त्याचा चांगला वापर करा. आमच्या पराभवाबद्दल कोणी बोलु नये चारवेळा पराभूत झालो आणि एकदा विजयी झालो. पालकमंत्र्यांनी सकारात्मक राजकारण करावे असे महाडिक म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here