माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मागण्या मान्य करण्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आश्वासन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मागण्या मान्य करण्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आश्वासन

युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले निवेदन सादर

दिल्ली येथील निवासस्थानी घेतली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट

सोलापूर // प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी भेट घेऊन मतदार संघातील विविध रस्त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करून माजी मंत्री बबनराव यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातील केलेल्या मागण्यांचे निवेदन नितीनजी गडकरी यांना दिले
यावेळी ना नितीनजी गडकरी यांनी प्रत्येक मागणी समजून घेत या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
या पत्रकात पुढे म्हटले आहे की आपण परतूर विधानसभा मतदारसंघातील वाटूर -जयपूर- बेलोरा- जांभोरा ते राहेरी त्याचबरोबर परतुर ते सातोना-मानवत रोड तसेच हट्टा-तळणी- गारटेकी- चौफुली ते सेवली- नेर – चितळी फाटा या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे मजबुती करण करण्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून या मागणीला प्रतिसाद देत ना नितीन गडकरी यांनी या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे
येणाऱ्या काळामध्ये या कामासाठी निधी उपलब्ध होणार असून ना गडकरी आश्वासक चर्चा यासंदर्भात केल्यामुळे लवकरच रस्त्यांची दुर्दशा संपणार असल्याची अपेक्षा त्यांनी पत्रकात नमूद केली आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की रस्ते विकासाबरोबरच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कामाविषयी नितींजी गडकरी यांनी समाधान व्यक्त केले असून युवा मोर्चा चे काम अतिशय उत्तम असल्याची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर दिल्यामुळे आपणास आनंद झाला असून यापुढेही प्रदेश महामंत्री म्हणून राज्यभरातील घराघरांमध्ये युवा मोर्चा पोहोचवण्याचे काम आपण करणार असल्याची या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here