माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचा 19 सप्टेंबरचा कुर्डूवाडी दौरा निश्चित!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(खासदार शरद पवार यांच्यासोबत धनंजय मुंढे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित (भैय्या) शिंदे दिली)

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसेवा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून बहुचर्चित असलेला कुर्डूवाडी दौरा अखेर येत्या सोमवारी (ता. 19 सप्टेंबर) नियोजित झाला आहे.

खासदार शरद पवार यांच्यासोबत धनंजय मुंढेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित (भैय्या) शिंदे दिली.

माढा तालुक्याचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या कुर्डूवाडी येथील माढा तालुका पंचायत समितीच्या आवारातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा हा गेल्या कित्येक महिन्यांपासून शरद पवार यांच्या वेळेअभावी रखडला होता. अखेर 19 सप्टेंबर रोजी शरद पवार यांनी पुतळा अनावरण सोहळ्याला येण्याचे मान्य केली आहे.

माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे व करमाळा विधानसभेचे आमदार संजय शिंदे यांची वडील विठ्ठलराव शिंदे यांनी माढा तालुक्याच्या विकासामध्ये भरीव योगदान दिल्याचे खुद्द शरद पवार देखील नाकारू शकत नाहीत, आमदार शिंदे बंधूंच्या विकासाची रथयात्रा व राजकीय रथयात्रेला दिवंगत नेते विठ्ठलराव शिंदे यांनी पाया घालून दिली.

कुर्डूवाडी पंचायत समितीच्या आवारात दिवंगत नेते विठ्ठलराव शिंदे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहून तब्बल कित्येक महिने झाले आहेत. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्यामुळे माढा व करमाळा भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांना ऐकण्याची ही संधी मिळाली आहे.

माढा लोकसभेचे नेतृत्व खासदार शरद पवारांनी केलेले आहे. भाजपचा वारू रोखण्यात माढा व करमाळा विधानसभेचे मोलाचे योगदान आहे. माढा व करमाळा दोन मतदारसंघांनी भाजपला अद्याप सीमा क्षेत्रात प्रवेश करू दिला नाही. आमदार बबनदादा शिंदे हे गेल्या 28 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माढाचे नेतृत्व करत आहेत.

शरद पवारांचा आदर सन्मान देत , अजितदादांना राजकीय गुरु मानत आमदार संजयमामांनी देखील करमाळा विधानसभा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आगामी 19 सप्टेंबर रोजीच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये खासदार शरद पवार काय बोलणार याकडे मात्र सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here