माँ साहेब घरकुल वसाहतीत नागरी सुविधेसाठी ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.श्री. अब्दुल सत्तार यांना आराखडा सादर.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माँ साहेब घरकुल वसाहतीत नागरी सुविधेसाठी ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.श्री. अब्दुल सत्तार यांना आराखडा सादर.

सोलापूर // प्रतिनिधी 

द.सोलापूर मौजे. कुंभारी येथे माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्थेच्या माध्यमातून बेघर विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी तयार केलेले आराखडा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.श्री. अब्दुल सत्तार साहेब यांना माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्थेच्या वतीने संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी मुंबई येथे सुपुर्त केले.
मा. ग्रामविकास राज्यमंत्री साहेबांना दिलेल्या आराखड्यात सोबत दिलेल्या निवेदनात सदरचे निवेदन मा. मुख्यमंत्री महोदय साहेब यांना दि. १४/१/२०२० रोजी समक्ष भेटून दिलेली आहे. त्यावरुन आपणांस हे निवेदन देत आहे. माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्थेच्या वतीने दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथे गरीब महिला बेघर विडी कामगारांसाठी केंद्र व राज्यशासनाच्या अनुदानातून ४२५६ (चार अजार दोनशे छपन्न) घरांची योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २००० घरे प्रत्यक्ष विडी कामगारांना शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते सन २००५ व २०१० साली टप्प्याटप्प्याने देण्यात आले आहे. या घरकुलांचा ताबा दिल्यानंतर विडी कामगार कुटुंबिय त्या घरात राहत आहेत. परंतु त्याठिकाणी रस्ता, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती यांची सोय नसल्याने विडी कामगार कुटुंबियांना अनेक समस्या व अडचणी येत आहेत. याबाबत सन २०१६ च्या तत्कालीन ग्रामविकास मंत्री मा. श्री. दादासाहेब भूसे साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्यावरुन सोलापूर मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हापरिषद सोलापूर यांच्या वतीने जा.क्र./जिपासो, सा.प्र.वि २ नापुसो/२०१८ जिल्हापरिषद सोलापूर दि. १४/०३/२०१८ या पत्राद्वारे मा. उपसचिव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन बांधकाम भवन मझेबन पर्थ मुंबई ३२ यांना माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्था मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर या वसाहतीत नागरी सुविधा करुन देणेबाबतच्या विषयी पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविले आहे. परंतु अद्यापी त्यांची कार्यवाही झाली नाही.
तरी माननीयांनी आपण ग्रामविकास मंत्री या नात्याने स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या माँ साहेब घरकुल वसाहतीत नागरीसुविधा उपलब्ध करून या गरीब महिला विडी कामगारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. असे नमुद करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्यासह विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीनिवास चिलवेरी, सैदप्पा जंगडेकर आदि उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here