माँ साहेब घरकुल वसाहतीत नागरी सुविधा पुरविण्याबाबत जिल्हाधिकारी शंकरकर यांचा दुजाभाव – विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर // प्रतिनिधी 

दक्षिण सोलापूर कुंभारी येते बांधण्यात आलेल्या माँ साहेब (स्वर्गीय मिनाताई ठाकरे) महिला विडी कामगार वसाहतीस नागरी सुविधा व मुलभूत गरजा पुरविण्याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. म्हणजेच दुजाभाव करीत आहेत असा आरोप माँ साहेब विडी कामगार घरकुल योजनेचे संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी थेठ जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना व स्वर्गीय मिनाताई ठाकरे घरकुल वसाहतीस नागरी सुविधा पुरविण्याबाबत मा. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर साहेब हे दुजाभाव करीत आहेत. अशा गंभीर आरोप साहेब विडी कामगार घरकुल योजनेचे संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी निवेदनाद्वारे केला आहे. सदर निवेदनात दक्षिण सोलापूर कुंभारी येथे केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातुन गरीब महिला विडी कामगारांसाठी राबविण्यात आलेल्या घरकुल वसाहतीत रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट (दिवाबत्ती) व इतर नागरी सुविधेबाबत दि. १२/०२/२०२१ रोजी व त्या अगोदर अनेकवेळा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्या अनुशंगाने शुक्रवार दि. १२/०२/२०२१ रोजी मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व मा. जिल्हाधिकारी सोलापूर, मा. महानगरपालिका आयुक्त, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर संबंधीत विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
सदर बैइकीत मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीमध्ये रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट, दिवाबत्ती व इतर नागरी सुविधेचे कामे चार ते पाच महिन्यांमध्ये नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे लेखी पत्र मा. निवासी जिल्हाधिकारी श्री. भारत वाघमारे साहेब यांच्या सही निशी दिले आहात. परंतु अद्यापी सदर कामकाजाबाबत कुठलीही कार्यवाही झालेली दिसुन येत नाही. या उलट माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या गोदुताई परूळेकर घरकुल वसाहत व नियोजित रे नगर प्रधानमंत्री आवास योजना या संस्थेनाच विशेष लक्ष देऊन आपण काम करीत असल्याचे दिसून येते. खर पाहता सोलापूरचे जिल्हाधिकारी या नात्याने सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे. पण तसे होताना दिसुन येत नाही हे अत्यंत दुदैवी बाब आहे. म्हणुन आमच्या संस्थेच्या वतीने आपणास विनंती करीत आहोत की, माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत नागरी सुविधा पुरवावे अशी विनंती करीत आहोत.
तरी माननीयांना विनंती की, सदर निवेदनाची गांभीर्याने व सहानुभुतीने दखल घेऊन लवकरात लवकर नागरी सुविधा पुरवावे. ही नम्र विनंती. असे नमुद करण्यात आले. असे नमुद करण्यात आले.
सदर निवेदनाचे प्रत १. मा. मख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. २. मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ३. मा. कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ४. मा. कामगार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ५. मा. महसुलमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ६. मा. सोलापूर जिल्हा पालकमंत्री, सोलापूर. यांना पाठविण्यात आले आहे.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर, दशरथ नंदाल, श्रीनिवास बोगा, गुरूनाथ कोळी, गणेश म्हंता, रेखा आडकी, पप्पु शेख, शोभा पोला आदि उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here