महिला विडी कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा:- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महिला विडी कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा:- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

सोलापूर // प्रतिनिधी 

विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला विडी कामगारांनी आघाडी शासनाने राबवित असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी(महाराज) यांनी शिवसंपर्क अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या विडी कामगारांच्या बैठकीत बोलतांना केले.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आवहानानुसार शिवसंपर्क अभियान अंतर्गत विडी कामगारांचे बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल व विठ्ठल कुऱ्हाडकर, मुनिनाथ कारमपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा आडकी यांनी केले.
विष्णु कारमपुरी(महाराज) यांनी शिवसंपर्क अभियानाचे माहिती देतांना म्हणाले की, सध्या विडी कामगार अत्यंत कठीण परिस्थितीत जात आहेत. कारण लॉकडाऊनमुळे विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटातुन विडी कामगारांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी विडी कामगारांना विविध योजनेद्वारे आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्या योजनांचा लाभ घेण्याचे काम विडी कामगारांचे आहे. अशा सर्व योजनांची माहिती कारमपुरी(महाराज) यांनी सदर बैठकीत दिली. आणि बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व कामगार सेनेच्या महिला घरोघरी जाऊन सर्व विडी कामगारांना ही माहिती द्यावे. असेही आवाहन केले. ठाकरे सरकार हे गरीब कामगारांचे कैवारी सरकार आहे. असेही कारमपुरी(महाराज) आघाडी सरकारचा उल्लेख केला.
सदर बैठकीत दशरथ नंदाल, लक्ष्मीबाई इप्पा, मुनिनाथ कारमपुरी, विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी आपले विचार मांडले. या बैठकीस शोभा पोला, अनिता बटगिरी, पवित्रा कारमपुरी, कविता नंदाल, पप्पु शेख, गणेश म्हंता,श्रीनिवास बोगा, बालाजी भांडारी, रमेश चिलवेरी, संध्याराणी कुऱ्हाडकर यांच्यासह विडी कामगार महिला उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here