महिलावरील अत्याचार व भ्रूण हत्या ज्या दिवसाला बंद होतील त्या दिवसापासून नवरात्राला खरी सुरुवात- ज्ञानेश्वर दीदी शेटे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महिलावरील अत्याचार व भ्रूण हत्या ज्या दिवसाला बंद होतील त्या दिवसापासून नवरात्राला खरी सुरुवात- ज्ञानेश्वर दीदी शेटे

( अपर पोलीस अधीक्षक अकोला मा.मोनीका ताई राऊत साहेब यांच्या हस्ते बाल कीर्तनकार ह भ प कु ज्ञानेश्वरी दीदी शेटे यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळ एकाच व्यासपीठावर कीर्तनात दंग झाले)

अकोला -अकोला जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कर्तव्य योगिनी सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथील राणी सती महल समोर पोलीस लान येथे आयोजित करण्यात आला असून ही संकल्पना मा जी.श्रीधर साहेब पोलीस अधिक्षक अकोला व मार्गदर्शक मा.मोनीका ताई राऊत साहेब यांच्या वतीने दि १०-१०-२०२१ ला दु २ ते ३ वाजेपर्यंत बाल कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी दीदी शेटे ( वय १० वर्ष ) यांच्या हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता
कीर्तनामध्ये बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरी दीदी शेटे यांनी सांगितले सध्या पूर्ण भारत देशामध्ये नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्यामध्ये आई जगदंबा ,भवानी ,दुर्गा माता, शारदा देवी यांची आराधना उपासना चालू आहे आणि दुसरीकडे आपल्या देशामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत स्त्री भ्रूण हत्या चालू आहे मुलीला पोटातच मारणे चालू आहे खऱ्या अर्थाने ज्या दिवशी आपल्या भारत देशातील महिलांवर होणारा अत्याचार थांबेल आणि स्त्री भ्रूण हत्या थांबेल त्या दिवसापासून खऱ्या नवरात्राला सुरुवात असेल किंवा तोच खरा नवरात्र उत्सव असेल गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातला असून भारतातील मंदिर सुद्धा काही महिने बंद होती पण या कोरोना काळामध्ये पोलीस ,डॉक्टर ,नर्स ,आशा वर्कर, पत्रकार यांच्या रुपात जनतेला देव पाहायला मिळाला या मंडळींनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचे जीव वाचवण्याकरता अहोरात्र प्रयत्न केले आणि म्हणून आपल्या भारत देशातील कोरोना नाहीसा करायचा असेल तर सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या दोन्ही लसी घेऊन प्रशासनाला सरकारला सहकार्य करावे ही विनंती कीर्तनाच्या माध्यमातून बाल कीर्तनकार ह भ प कु ज्ञानेश्वरी दीदी शेटे यांनी प्रतिपादन केले यावेळी कीर्तनामध्ये गायनाची साथ करायला गजानन महाराज ऐरोकार, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, ज्ञानेश्वर महाराज जावरकर , सरोदे भाऊ,मोहन महाराज काळे, मृदंगाचार्य-विलास महाराज कराळ,विनेकरी बाभुळकर महाराज ही महाराज मंडळी असून कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली गणेश महाराज शेटे शेख, गुरुजी व्याळा,सावळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here