महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर संक्रांत येण्याची वेळ:- माऊली हळणवर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 


राष्ट्रीय महामार्गासाठी अथवा राज्य महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला महाविकास आघाडी सरकारने २० ते ६० टक्क्यांनी कमी केला आहे. याबाबतचा निर्णय महसूल विभागाने ऐन संक्रांती दिवशीच घेतला आहे. शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरच संक्रांत बसवली असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गाची अनेक कामे सुरु आहेत. याकामी संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनींचा मोबदला कृषक जमिनीसाठी चार पट तर अकृषक जमिनीसाठी दोन आहेत.

याकामी शेतकऱ्यांचे अनेक भूखंड संपादित करण्यात पट देण्यात येत होता. हा मोबदला कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल विभागाने घेतला आहे. १४ जानेवारी रोजी हा निर्णय घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे यंदाची संक्रांत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवरच बसवली की काय? अशी चर्चा शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. राज्याच्या महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले असून, अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनींचे मूल्यांकनही २० ते ६० टक्क्यांनी कमी केले आहे. कृषक जमिनी संपादित करावयाच्या झाल्यास यासाठी दिला जाणारा मोबदला २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तर अकृषिक जमिनी संपादित करावयाच्या झाल्यास याबद्दत देण्यात येणारा मोबदला ६० टक्क्यांनी कमी केला आहे. सबंध देशभरात राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे सुरू आले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात राज्य सरकारचाही वाटा आहे. यापोटी राज्य सरकारला मोठी रकम शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. यामुळेच की काय महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा, शेतकन्यांमध्ये होऊ लागली आहे. यासंदर्भात भाजपा किसान मोर्चाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा कळवळा असणारे सरकार म्हणून सत्तेवर आलेली महाविकास आधाडी, शेतकन्यांच्या पाठीत खंजीर खुपसू पाहत आहे या निर्णयास कडाडून विरोध केला जाईल, अशी प्रतिक्रिया किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माऊली हलवर यांनी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here