महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत फैजपूर जळगाव येथे शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत फैजपूर जळगाव येथे शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.

सोलापूर // प्रतिनिधी 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे हे बुधवार दि. २३ जूनपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज बुधवारी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौ-याची ते सुरुवात केली आहे.*

काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन संपन्न झालेल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे बुधवारी केंद्र सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्याच्या प्रतींचे दहन करून या दौ-याची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

तसेच या दौऱ्यात नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे या भागातील कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना भेट देतील तसेच काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेणार आहेत तसेच ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे व इतर प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी हेही असतील.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here