महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांकडे घरेलु कामगारांची नोंदणी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

महाराष्ट्र शासनाने असंघटित क्षेत्रातील विविध कामगारांसाठी जाहिर केलेल्या योजना अंतर्गत कामगार सेनेच्या वतीने घरेलु कामगारांचे अर्ज सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दाखल करण्यात आले.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सक्षमत लाभावी यासाठी विविध योजना जाहिर केले आहेत. त्याअंतर्गत आज शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे सदस्य असलेले घरेलु कामगारांचे अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे दाखल करण्यात आले. यावेळी विष्णु कारमपुरी (महाराज), विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीनिवास बोगा, गुरूनाथ कोळी आदि उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणी विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने कामगारांसाठी जाहिर केलेल्या योजनेंचा लाभ घेणे ही कामगारांची जबाबदारी असून याबाबत दक्षतेने रहावे. त्याच बरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने केंद्र व राज्य शासनांचे योजना कामगारांपर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगारांना आवाहन करण्यात येते की, आपण कामगार सेना कार्यालय १५९३ कुचन नगर, पद्मशाली चौक येथे मो.नं. ९८८१३०१७७७ संपर्क साधून विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here