महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार करा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार करा

(राज्य निवडणूक आयुक्तांच्या सूचना)

 

सोलापूर // प्रतिनिधी

आगामी महानगरपालिका , जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने कालबध्द कार्यक्रम आखावेत. मतदार जनजागृतीसाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करावे.5 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी केल्या.

राज्य निवडणूक आयुक्त श्री. मदान, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर , उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी यांना महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले.

1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये मतदार यादी अद्ययावत व शुध्द होण्याच्या दृष्टिने 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टेाबर 2021 या कालावधीत मतदार पडताळणी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. दुबार, समान नोंदणी , एका पेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याव्दारे घरोघरी भेट देवून पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द होणाऱ्या एकत्रित प्रारूप मतदार यादीवर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्वीकाराव्यात. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढाव्यात. त्यानंतर 5 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबविणेकरीता जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी समन्वयाने मतदान जागृती करणे व मतदार यादी शुध्दीकरण करणेकामी मतदार नोंदणी बाबत पत्रकार परिषद घेवून नागरिकांना आवाहन करावे. राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या बैठका घेवून त्यांना आगामी निवडणुकाबाबत आवगत करणे, महाविद्यालय, म.न.पा. शिक्षण मंडळाच्या व शिक्षण मंडळ जिल्हा परिषद यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या माध्यमिक शाळेमध्ये मतदार जागृती अभियान विविध स्पर्धेचे, प्रभात फेरी, पथनाट्याचे आयोजन करून राबविणे, शहरातील गर्दीच्या व मोक्याच्या ठिकाणी डिजीटल प्लेक्स, होर्डीग्ज, एलईडी स्क्रीन लावून मतदार जनजागृती करा. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मतदार जनजागृती निर्माण करण्यासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करणे, आकाशवाणी केंद्र व स्थानिक केबल जाहिराती, सोशल मिडीया, वृत्तपत्र जाहिरातीव्दारे प्रसिध्दी तसेच वेबसाईटवर मतदान जागृतीचे पोस्टर्स अपलोड करणे, याव्दारे जास्तीत जास्त जनजागृती करून नवमतदार नोंदणी करण्याबाबत व मतदार यादी अद्ययावत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here