महादेवराव (आप्पा) महाडिक यांनी दाखल ‌केला उमेदवारी अर्ज!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिल्हा बँकेची निवडणूक बहुरंगी होणार

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवार पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्वच नेते बोलताना दिसत आहेत पण अर्ज भरताना सर्वच नेते मोठ्या शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करत आहेत.याच पार्श्वभूमीवर आज माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी जिल्हा बँकेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी बोलताना त्यांनी १३६ पैकी १२० ठरावधारक आपल्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांच्या सोबत अर्ज दाखल करताना माजी आमदार अमल महाडिक, राजाराम कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, माजी महापौर सुनील कदम, हातकणंगले पंचायत समितीचे उपसभापती राजकुमार भोसले,पापा चव्हाण, बापू लोकरे, प्रमोद महाडिक, संतोष पवार, यांच्या सह महाडिक – आवाडे – कोरे गटाचे ठरावधारक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here