महात्मा गांधीजींची सत्य व अहिंसा वृत्ती जगात लोकप्रिय – साहित्यिक संजय सोनवणी स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या स्वावलंबीसत्य व अहिंसा वृत्तीचे संपूर्ण जगाने स्वागत केले असून त्यांनी जगाला स्वच्छतेची शिकवण दिली. अहिंसा परमो धर्म’ या सूत्राचा वापर त्यांनी आयुष्यभर केला. त्यांचे विचार समाज परिवर्तन करणारे होते. म. गांधीजींचे त्यागशांती,अहिंसा इ. गुण आज साऱ्या विश्वाने मान्य केले आहेत. गांधीजींच्या विचारांमुळे जगाच्या नकाशात भारताची स्वतंत्रपणे ओळख निर्माण झाली असून संपूर्ण जगाला प्रेरणा देणाऱ्या गांधीजींचे विचार आज खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची गरज आहे कारण गांधीजींची सत्य व अहिंसा वृत्ती आज संपूर्ण जगात लोकप्रिय झाली आहे.’ असे प्रतिपादन साहित्यिक संजय सोनवणी यांनी केले.       

      गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी तर भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी साहित्यिक संजय सोनवणी हे गांधीजींना महात्मा का म्हणावे?’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे हे होते. राष्ट्रपिता म.गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनानंतर प्रास्तविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी संस्थेची यशस्वी वाटचाल सांगून म.गांधी आणि शास्त्रीजी’ यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकून आज त्यांचे गुण आचरणात आणण्याची गरज आहे.’ असे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. पुढे बोलताना साहित्यिक सोनवणी म्हणाले की,  ‘पंढरीत भक्तीचे मळे फुलतात हे माहित आहे पण स्वेरीत आल्यानंतरकॅम्पसची संस्कृती पाहिल्यावर इथे ज्ञानाचे मळे देखील उत्तमपणे फुलतात हे प्रकर्षाने जाणवले. हे युग ज्ञानाचे आहे त्यामुळे ज्ञानाची निर्मिती करताना नेमके काय शिकावे यासाठी शाळांची निर्मिती झाली आहे. यामध्ये महापुरुषांच्या जयंत्या साजरे करण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कार्याचेयोगदानाचे अनुकरण समाजातील नागरिकांनी करावे आणि विकासात्मक संस्कृतीची निर्मिती करावी हे होय.’ असे सांगून महात्मा गांधी व अनेक थोर हुतात्म्यांची उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. सांगोला विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रा. धनाजी पाटील यांनी ज्ञानाला सशक्त करण्याचे कार्य डॉ. रोंगे सरांनी केले असून डॉ. रोंगे सरांनी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचा विडा उचलला आहे.’ असे सांगून स्वेरीच्या पंचवीस वर्षाच्या कार्यावर प्रकाश टाकला.अध्यक्षस्थानावरून बोलताना दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘गांधीजींच्या विचारसरणीचा वसा आणि वारसा यांचे विवेचन करत असताना व  उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करताना भारताने गांधीजींचे विचार जपले पाहिजेत. श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीत घवघवीत यश मिळवून व्हाईस चेअरमन पदी विराजमान झाल्यामुळे स्वेरीच्या विश्वस्त सौ.प्रेमलता रोंगेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूरच्या विद्यापीठ सिनेटपदी निवड झाल्याबद्दल स्वेरीचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगेविद्यापीठ सिनेट संस्था मतदार संघातून अदभूत यश मिळविल्याबद्धल स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगेसोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीत पदवीधर गटातून दणदणीत विजय मिळविल्याबद्धल प्रा.अजिंक्य देशमुखडॉ. विद्याराणी क्षीरसागरडॉ. मिनाक्षी पवारडॉ.दीप्ती तंबोळीबी.फार्मसीचे डॉ. वृणाल मोरेतसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्धल डॉ.महेश मठपतीडॉ. संदीप वांगीकरडॉ.एच.एच. पवारडॉ.श्रीकृष्ण भोसलेप्रा.व्ही.डी.जाधवप्रा. नीता कुलकर्णीप्रा. सचिन खोमणेप्रा. कुलदीप पुकाळेप्रा. यशपाल खेडकर  तसेच गांधी जयंती निमित्त हॉस्टेल स्वच्छता व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे देखील बक्षिसे देऊन विशेष सत्कार करण्यात आले.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्वेरीच्या प्राध्यापकांनी केलेले संशोधनविज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मिलाप असलेल्या स्वेरीयन’ या  त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्रीकांत पाटीलऍड.उदय बागल,  राजेंद्र पवारचव्हाणराजूरकरउन्मेष आटपाडीकर,जालिंदर चांदगुडेगणेश आटकळेप्रा.संजय धायगुडेसंस्थेचे विश्वस्त एच.एम. बागलविश्वस्त बी.डी. रोंगेस्वेरी कॅम्पसचे इन्चार्जबी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवेसर्व अधिष्ठातासर्व विभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी शिंदे व प्रिती काशीद यांनी केले तर प्रा. यशपाल खेडकर उपस्थितांचे आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here