मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या यांच्या प्रयत्नामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर (सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे कामाला सुरुवात केली:- दिलीप बापू धोत्रे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर शहरात पावसामुळे सर्वच भागात प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .अनेक नागरिकांचे या खड्ड्यामुळे अपघात झालेले आहेत, काल दोन महिला या भक्तिमार्गाकडून येणारा रस्ता ब्लड बँकेसमोर समोरच्या खड्ड्यामध्ये पडून जखमी झाले आहेत.

परंतु नगरपालिकेला जाग येत नाही म्हणून आज पासून पंढरपूर शहरातील खड्डे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप .बापू धोत्रे यांच्या वतीने सिमेंट काँक्रेट ने बुजवण्यास सुरुवात करण्यात आली .

दिवसभर पंढरपूर शहरात वाहतूक असल्यामुळे शहरातील सावरकर चौक, स्टेशन रोड ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,नगरपालिका ,डीवायएसपी ऑफिस समोर बोगदाजवळील, सरगम चौक येथील सर्व खड्डे रात्री वाहतूक बंद झाल्यावर बुजवण्यात येणार आहेत. सर्व खड्डे सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन ने बुजवण्यात येणार आहेत,,
यावेळी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे,मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष संतोष कवडे,नगरसेवक शिवाजी मस्के, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले, मनसे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळणेरकर, अर्जुन जाधव, अवधूत गडकरी, सुरज देवकर इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here