मध्य रेल्वेच्या धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहिमेत १६० व्यक्तींवर कडक कारवाई!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम प्रवास प्रदान करण्याच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून एक व्यापक धूम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात ही धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.दिनांक: २६ फेब्रुवारी २०२२
प्रप क्रमांक २०२२/०२/३४
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.

या मोहिमेमध्ये, दि. २४.२.२०२२ आणि २५.२.२०२२ रोजी, एकूण १६० व्यक्तिंवर कारवाई करण्यात आली आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COPTA) – 2003 अंतर्गत रु. २९,७००/- दंड आकारण्यात आला.

यामध्ये मुंबई विभागातून ६७ प्रकरणे व रु.१३,२००/- दंड, भुसावळ व नागपूर विभागातून प्रत्येकी ३७ प्रकरणे व रु.७,४००/- दंड, पुणे विभागातील ९ प्रकरणे व दंड रु.१५००/- दंड आणि सोलापूर विभागातील १० प्रकरणे व रु.२००/- दंड वसूल करण्यात आले.

धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि COPTA-2003 अंतर्गत दंडनीय आहे. मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना रेल्वे आवारात आणि गाड्यांमध्ये धुम्रपान टाळण्याचे आणि स्वतःसाठी तसेच इतर प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here