मधुकर महाराज साबळे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार प्रदान!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान ऋषी पंचमी यात्रा महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये विश्व वारकरी सेनेच्या वतीने ह भ प श्री मधुकर महाराज साबळे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला
ह भ प श्री मधुकर महाराज साबळे यांनी पूर्ण आयुष्यात निस्वार्थी ,निष्कपटी व निष्ठावंत भावनेने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला असून आतापर्यंत पंढरपूरच्या 36 पायदळ वाऱ्या केल्या असून श्री संत सोनाजी महाराज सोनाळा संस्थान ते पंढरपूर दिंडीचे दिंडी चालक महाराज आहेत तसेच दरवर्षी पिक पाण्याचा अचूक अंदाजाची भविष्यवाणी महाराज सांगत असतात आणि गावोगावला ज्ञानेश्वरी, गाथा पारायण, भागवत कथा ,कीर्तन वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचं कार्य महाराजांच्या हातून होत आहे आणि याच गोष्टीची दखल विश्व वारकरी सेनेने घेऊन निष्ठावंत वारकरी पुरस्कार ऋषिपंचमीच्या पावन पर्वकाळावर योग योगेश्वर संस्थांमध्ये विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी विश्व वारकरी सेना वर्धा जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज खंडार ,श्रीधर महाराज पातोंड, एकनाथ महाराज पवार ,गजानन महाराज येरेकर, बबनराव पाटील खरड, विठ्ठलराव तुरखडे सर, दिलीपराव झांबरे, मुरलीधर भाऊ शेंद्रे व पंचक्रोशीतील गायक वादक मंडळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here