मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर तिहेरी अपघातानंतर चालकाचे पलायन 12 जण गंभीर जखमी,पोलिस अधिक्षकांची घटनास्थळाला भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर तिहेरी अपघातानंतर चालकाचे पलायन
12 जण गंभीर जखमी,पोलिस अधिक्षकांची घटनास्थळाला भेट

मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर एम आय डी सी च्या समोर आयशर टेंपो,वॅगनोर कारगाडी,मोटर सायकल असा तिहेरी अपघात होवून 12 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान,या घटनास्थळाला पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे यांनी भेट देवून जखमींची विचारपूस करून तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या घटनेची हकिकत अशी,मंगळवेढयाहून केळी घेवून जी जे 13 ए डब्ल्यू 8279 या क्रमांकाचा आयशर टेंपो पंढरपूरकडे दुपारी निघाला होता.या दरम्यान,एम एच 02,ई एच 7867 ही वॅगनोर कार पंढरपूरकडून मंगळवेढयाकडे येत असताना एम आय डी सी च्या समोर या दोन वाहनाचा समोरासमोर अपघात होवून या गाडयांनी मोटर सायकल क्रमांक एम एच 13 ए 6808 हिलाही धडक दिल्याने या तिहेरी अपघातामध्ये किसन नामदेव गरंडे,तातोबा पांडुरंग गरंडे,सारिका तातोबा गरंडे,शौर्या तातोबा गरंडे,प्रविण तातोबा गरंडे,(सर्व रा.गोणेवाडी),एकनाथ बाबुराव पाटील,मोनाली एकनाथ पाटील(रा.सुर्डी ता.जत जि.सांगली),म्हाकू लक्ष्मण पांढरे,कमल म्हाकू पांढरे,आरव पांढरे(सर्व रा.गोपाळपूर),बालाजी शिवाजी हेंबाडे,प्रियंाका बालाजी हेंबाडे (सर्व रा.डोंगरगाव) आदी 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान,अपघातप्रसंगी जिल्हयाचे पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे हे मंगळवेढयाहून पंढरपूरला जात असताना हा अपघात घडल्याने तात्काळ त्यांनी घटनास्थळी भेट देवून जखमींची विचारपूस करून वाहनाव्दारे जखमींना तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यास त्यांनी इतर पोलिसांच्या मदतीने तत्परता दाखवली.यावेळी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने,सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसोा पिंगळे, पोलिस हवालदार शिवाजी पांढरे आदीनी व अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी जखमींना दवाखान्यात पोहोच करण्यास मदत केली.जखमींना मंगळवेढा,पंढरपूर व सोलापूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अपघातानंतर आयशर टेंपोचा चालक घटनेची खबर न देता तसेच जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.जखमींवर सध्या उपचार सुरु असल्याने उपचार यशस्वीरित्या पुर्ण झाल्यानंतर आम्ही पोलिस ठाणे येथे येवून अपघाताबाबत तक्रार दाखल करीत असल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here