भैरवनाथ साखर कारखान्याने ग.हं.२०२१-२२मधील उसाचा हप्ता १०० रुपयांप्रमाणे शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा करणार : मा.प्रा.शिवाजीराव सावंत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवानाथ शुगर वर्क्स लि., युनिट नं.3, लवंगी, या कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ करिता गळीत झालेल्या ऊसास प्रति मे. टन १०० रु.प्रमाणे उस बिल शेतकर्‍यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.प्रा.शिवाजीराव सावंत यांनी दिली.

पुढे बोलताना मा. मा.प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की भैरवनाथ शुगरने गळीत हंगाम २०२१-२२ ची एफआरपी १९३०.८० रु. प्रति मे. टन असताना देखील यापूर्वीच २१०० रु. प्रति मे. टन ऊस दर दिलेला आहे. सुरुवातीपासुन ऊस उत्पादकांशी असलेली बांधीलकी कायम ठेवत शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता व ऊस उत्पादकांना मागणी केल्याप्रमाणे भैरवनाथ शुगरन १०० रु प्रति मे. टन देण्याचे जाहीर केले आहे व सदरची रक्कम लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करीत आहोत.

यावेळी व्हा.चेअरमन श्री. अनिल(दादा) सावंत यांनी सांगितले की, कारखान्याचे संस्थापक मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) व चेअरमन श्री. शिवाजीराव सावंत सर यांचे अचुक मार्गदर्शनाखाली कारखान्याचे गाळप सुरळीत चालू आहे. यावेळी कारखान्याचे जनरल मँनेजर रविंद्र सांळुखे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here