भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन मा.अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त किर्तन सोहळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन मा.अनिल(दादा) सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य लवंगी येथे झी टॉकीज फेम ह.भ.प.भागवताचार्य रूपालीताई सवने यांचे किर्तन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन मा.अनिल(दादा) सावंत मित्र मंडळ लवंगी यांनी केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. रूपालीताई सवने यांचा सत्कार लवंगीचे माजी सरपंच सरस्वतीताई निकम यांनी केला. सावंत कुटुंबीयांनी लवंगी च्या माळरानावर नंदनवन फुलवले असे गौरव उद्गार ह.भ.प. रूपालीताई सवने यांनी काढले. यावेळी व्हा.चेअरमन मा.अनिल(दादा) सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमास लवंगी व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेतला. या भागात असा धार्मिक कार्यक्रम पहिल्यांदाच झाला आहे. त्यामुळे भाविकमध्ये आनंदाचे वातावरण होते.
किर्तन सोहळ्यामध्ये भैरवनाथ शुगरचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, लवंगीचे सरपंच डॉ.कृष्णांत माने, आप्पा माने-सरकार, चंद्रकांत देवकर गुरुजी, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, रामचंद्र जाधव, अशोक निकम, सरपंच तानाजी जाधव, शशिकांत निकम, सरस्वतीताई निकम, रामकृष्ण चव्हाण, तानाजी पवार, बालगिरी गुगवाड, मच्छिंद्र खताळ, गुलाब थोरबोले, महादेव देवकर, सुरेश पवार, शिवाजी जाधव, सुरेश गोणे, बंडु शेणवे, भगरे, शिवशंकर भांजे, समीर जाधव, लाला शेख, दर्याप्पा हडसंग, शिवाजीराव चव्हाण, सचिन घाटगे, तानाजी खडतरे, शाहीर शेख, मायाप्पा पांढरे, पिंटू खडतरे, सुभाष वाघमारे व पत्रकार बांधव तसेच भैरवनाथ शुगरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मा.आनिल(दादा) सावंत यांचा सत्कार मा.अनिल(दादा) सावंत मित्र मंडळ लवंगी यांनी केला. सूत्र संचालन श्री येडवे गुरुजी यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here