भैरवनाथ शुगरचा पहिला हप्ता २३०० प्रमाणे जमा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भैरवनाथ शुगर वर्क्स लि., युनिट नं.३, लवंगी, या कारखान्याने चालु गळीत हंगाम २०२२-२३ करिता गळीत झालेल्या ऊसास पहिला हप्ता प्रति मे. टन २३०० रु. प्रमाणे बँकेत जमा केल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा. प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली.
भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,चे संस्थापक मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन मा.प्रा.शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगरच्या सोनारी, विहाळ, लवंगी, वाशी व आलेगाव या पाचही युनिटच्या माध्यमातून शेतकर्यांच्या ऊसाला चांगला दर देवून ऊस उत्पादक शेतक-यांना अर्थिक हातभार लावण्याचे काम सावंत परिवार करत आहे. भैरवनाथ शुगरने गेल्या हंगामात २२०० रु प्रती मे.टन दर दिलेला आहे. २०२२-२३ च्या चालू हंगामातील गाळप सुरू झाले असून शेतकर्यांना पहिली उचल २३०० प्रती मे.टन दिली जाणार आहे. शेतकर्यांचा सर्व ऊस गाळपासाठी प्रोग्रामप्रमाणे नेला जाणार असून चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा कारखण्यास करावा असे आवाहनही भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा.प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले. तसेच एफआरपी पेक्षा जास्त दर आता पर्यन्त दिलेला आहे. शेतकर्यांनी आजपर्यंत दाखवलेल्या विश्वासावरच भैरवनाथ शुगरचे विक्रमी गाळप होईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. अनिल (दादा) सावंत, जनरल मँनेजर रविंद्र सांळुखे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here