भीमा रणांगणात बिगर सेनापतींच्या शत्रू सैन्याचा पराभव अटळ! निवडणूक बिनविरोध करूया! प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

येत्या 18 तारखेला अर्ज माघारी येण्याच्या दिवसानंतर भीमा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी आज रोजी भीमाची निवडणूक बिनविरोध होणार असेच चित्र दिसत आहे.कारण पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील सहकारातील दोन्हीही दिग्गज नेत्यांनी भिमाच्या निवडणुकी तील आपल्या सक्रिय सहभागा बाबत आजवर कुठेही जाहीर
विधान केलेले दिसत नाही.दुसऱ्या फळीतील सुस्ते,
पुळुज,टाकळी सिकंदर,पाटकुल येथील नेतेमंडळी निवडणूक लावण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत.परंतु नेतृत्व करणाऱ्या बहुसंख्य महत्त्वाच्या पुरुष उमेदवारांचे सर्वच अर्ज अवैध ठरल्यामुळे विरोधी पॅनलच्या टायर मधील हवा निघून गेल्याचे व गाडी मध्येच अडकल्याचे चित्र दिसत आहे.व्यक्ती उत्पादक गटांमध्ये प्रमुख नेते मंडळींचे अर्ज बाद ठरल्यामुळे ज्या कुणाचा अर्ज टिकला आहे त्या सामान्य कार्यकर्त्यांची जमवाजमव करून त्यांना घोड्यावर बसून पॅनलची गोळाबेरीज करावयाचा दुबळा प्रयत्न विरोधकांना विजयापर्यंत नेऊ शकत नाही.अशा विरोधाला कितपत धार येईल?त्याचा उपयोग होईल का? नक्की कोणासाठी निवडणूक लढवायची? खर्च कोण उचलणार? सहकाराचा काहीच अनुभव नसलेले सामान्य कार्यकर्ते गोंधळून जाणार नाहीत का ? असे एक ना अनेक प्रश्नांची सभासदां मधून चर्चा होत आहे व त्याचा फायदा आम्हाला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही युद्धभूमीवर सेनापती शिवाय कुठलेही युद्ध जिंकता येत नसते.लढताना सामान्य सैनिकांचे नीतिधैर्य-मनोबल टिकण्यासाठी एका शूर सेनापतीची गरज असते.विरोधकांकडे आज अशा शूर सेनापतींचा अभाव असल्यामुळे विरोधी सैन्यदलाचे मनोबल खचले असून त्यांनी निवडणूक लावण्याचा दुबळा प्रयत्न सोडून देऊन तडजोडीची भूमिका स्वीकारावी. तीच भूमिका संस्थेच्या हिताची व सभासदांच्याही फायद्याची ठरेल व या भूमिकेचे सर्वत्र स्वागतच होईल. एका नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होईल. याउलट आमच्याकडे भीम-अर्जुनासारखे धनुर्विद्या प्राप्त केलेले धनुर्धर व गदाधारी शूर योद्धे व अनेक सेनापती असून सर्व पक्षीय भीमा परिवार रुपी रथाचे सारथ्य करण्यासाठी दोन्ही राज्य सरकार व केंद्र सरकार मध्ये दबदबा राखून असलेले व सर्वच पक्षात खास रिलेशन ठेवून असलेले खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखा सर्वशक्तिमान अष्टपैलू श्रीकृष्ण ही लाभला आहे.त्यामुळे युद्धभूमीवर विजय आमचाच होणार असून पराभवाची नामुष्की टाळून एका निकोप व निरोगी राजकारणाला सुरुवात करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक व बिनविरोधची भूमिका स्वीकारून एकजुटिने कारखान्याच्या व सभासदांच्या प्रगतीसाठी व आर्थिक उन्नतीसाठी हा कारखाना पुन्हा महाडिक यांच्या ताब्यातच बिनशर्त बिनविरोध द्यावा व 15 वर्षांपूर्वी केलेल्या उपकाराची परतफेड करावी, विरोधकांना या निर्णयासाठी सर्व सभासदांकडून शाबासकीच मिळेल. सामान्य सभासदाला निवडणुकीतील त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, महाडिक साहेब व त्यांचे संचालक मंडळ विरोधी मानसिकतेच्या सर्व सभासदांना व कामगारांना अत्यंत आपुलकीची व समानतेची वागणूक देतील याची मी नेतृत्वाच्या वतीने ग्वाही देतो असे भावनिक आवाहन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तथा सोलापूर किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी सर्व विरोधकांना आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here