भीमा बचाव समितीचे पापकर्म!गलिच्छ राजकारण!हातातोंडाशी आलेला घास धोक्यात!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा बचाव समितीचे पापकर्म!गलिच्छ राजकारण!हातातोंडाशी आलेला घास धोक्यात!

सोलापूर // प्रतिनिधी

सोहाळे-कोथाळेतून उगम पाऊन लगेच टाकळी सिकंदर येथे विसर्जित पावलेल्या ऊथळ ओढ्याचा आता खळखळाट फार वाढला असुन भीमा बचाव संघर्ष समितीच्या राजकीय स्वार्थाने पछाडलेल्या सदस्यांचे डोके ठिकाणावर आहे का? त्यांनी गेले काही दिवस भीमा कारखान्याची सोशल मीडियावर असंसदीय व शिवराळ भाषेमधे वारेमाप बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम जाणीवपूर्वक राबविला आहे. त्यामुळे कारखान्याला बँक व सरकार पातळीवर अनंत अडचणींना सामोर जावं लागत आहे.शेवटच्या महिन्यातील काही शेतकऱ्यांची ऊस बिले थकलेली आहेत. तसेच कामगारांचा काही महिन्यांचा पगार ही थकलेला आहे हे एक कटू सत्य आहे.त्यातून मार्ग निघत आला आहे.भीमा कारखान्याच्या बँक खात्यावर पैसे शिल्लक आहेत आणि चेअरमन व संचालक मंडळ थकित देणी मुद्दामहून देत नाहीत अशाप्रकारचे खोटे चित्र ऊभे करून केला जाणारा अपप्रचार हा एक खोडसाळपणा असून तशी वस्तुस्थिती नाही. एकुणच देशातील साखर उद्योगा पुढील विविध संकटांमुळे भीमा हा एकमेव साखर कारखाना अडचणीत आला नसून सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशातील एकूण 732 साखर कारखान्यांपैकी 550 साखर कारखाने दुर्दैवाने भीमा प्रमाणेच अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांची महाराष्ट्रात 3 हजार कोटी तर संपूर्ण देशात 20 हजार कोटी रुपयांची ऊसबीले थकली आहेत.यावरुन थकित एफ.आर.पी.व कामगार वेतनाचा प्रश्न फक्त एकट्या भीमा कारखान्याचा नसून तो देशव्यापक व किती गंभीर आहे याचे भान गुडघ्याला बाशिंग बांधून सत्तेसाठी ऊताविळ झालेल्या व आसुसलेल्या भीमा बचाव समितीला उरले नसून राजकीय स्वार्थाने पछाडलेल्या, संकुचित बुद्धीच्या, नकारात्मक प्रवृत्तीच्या मोहोळ तालुक्यातील दुसऱ्या फळीतील भीमा बचावच्या अविचारी मंडळींनी जाणून बुजून अलीकडेच एक ‘पापकृत्य’ केले.व ‘तो मी नव्हेच ‘असा अविर्भाव ते आणत आहेत.’भीमा बचाव संघर्ष समिती’असं गोंडस नाव पुढे करून प्रत्यक्षात मात्र ही मंडळी गेली दीड वर्ष झालं भीमाच्या सभासद कामगारांचा कारखान्याचा “कर्दनकाळ” बनलेली आहे ही बाब आता सभासद कामगारांच्या लक्षात आली आहे.याची किंमत बचाव समितीला मोजावी लागेल. गतवर्षीसुद्धा पूर्व-हंगामी कर्जासाठी राज्य सरकारने थकहमी देऊ नये यासाठी पवित्रा घेतला होता.परंतु देशाचे प्रगल्भ नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, नानाभाऊ पटोले, खा.धनंजय महाडिक यांच्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर व्यापक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वच कारखान्यांना आर्थिक मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरले म्हणून गेल्या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला.
यावर्षीही देशातील साखर उद्योगापुढील प्रचंड अडचणी लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर सर्वच कारखान्यांना आर्थिक मदत करण्याचे सरकारी धोरण आखले गेले असून सदरच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर भीमा कारखान्याला अंदाजे 30 कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.परंतु एखाद्या हॉरर सिनेमा मध्ये शोभेल अशा चेटुक गतीने भिमा बचाव संघर्ष समितीचे सदस्य कोल्हापूरच्या दोन बड्या नेत्यांकडे जाऊन बसले व अंतीम टप्प्यात आलेले भीमाचे आर्थिक मदतीचे काम होऊ देऊ नये यासाठी साकडे घालत आडवा पाय घालण्याचे निंदणीय काम केले. सदरची 30 कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत मिळाल्यानंतर भीमा कारखान्यापुढील एनपीए व थकित ऊस बिले व कामगारांचे थकित वेतन हे सर्वच प्रश्न फुल अँड फायनल निकालात निघणार आहेत व त्यामुळे सभासद -कामगारांमधे व परिसरात आनंदाचे चैतन्याचे वातावरण पसरले होते. मात्र राजकीय स्वार्थाने व राजकिय सुडबुद्धीने पेटून बेभान व झालेल्या बचाव समितीच्या,नादान, सदस्यांनी या आनंदात शेवटच्या क्षणी विरजण घातले.त्यांच्या या पापकृत्याने भीमा कारखाना परिसरात सभासदा- कामगारांना धक्का बसला असून नाराजीचे-चिंतेचे – क्रोधाचे वातावरण पसरले आहे. सभासद कामगारांपुढे जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मूळ प्रश्‍न समजून न घेता तारतम्य व विवेक बुद्धी हरवून काम करणे योग्य नव्हे,त्या सर्वांचे डोकं ठिकाणावर आहे का?एकिकडे संस्था टिकली पाहिजे म्हणायचं अन् दुसरीकडे मार्गात सुरुंग पेरणार्यांनी सभासद कामगारांविषयी खोटा कळवळा-पुळका दाखवू नये. त्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे सभासद कामगार व संस्था देशोधडीला लागू शकते याचे भान त्यांना राहिले नाही हे दुर्दैव आहे केवळ विरोधासाठी विरोध करणं हे चुकीचा आहे राजकारण हे तत्वांचा असलं पाहिजे विद्यमान संचालक मंडळाने कोट्यवधी रुपये गुंतवून वीस वर्षापासून प्रलंबित असलेला महत्त्वकांक्षी असा विस्तारीकरण व कोजन प्रकल्प पूर्ण केला सभासदांच्या मुलांसाठी शैक्षणिक संकुल उभा केले या विकास कमान बाबत मात्र ते चकार शब्द काढताना दिसत नाहीत व कारखान्याच्या मार्गात मात्र वेळोवेळी अडचणी निर्माण करताना दिसतात अशा मंडळींमुळे राजकारणाचे गलिच्छ चित्र भीमा परिसरात उभे राहिल्याने मला मनस्वी दुःख होते.
असे भावनाविवश उद्गार प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काढले.

बचाव समितीकडून ना.सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचीही दिशाभूल

भीमा बचाव समितीच्या इन मीन तीन सदस्यांनी कोल्हापूरच्या दर आठवडा वाऱ्या करून नामदार सतेज पाटील – ना.हसन मुश्रीफ -महाडिक यांच्या राजकीय वैराचा गैरफायदा घेत भीमाला सरकारकडून मिळणारी कर्जरूपी मदत मिळू नये या संकुचित विचाराने भीमावर कारवाईसाठी साकडे घालुन दिशाभूल केल्याचे स्पष्ट दिसते. आश्चर्याची बाब म्हणजे महाडिक यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे सहकारातील अनुभवी आमदार प्रशांत परिचारक व आमदार राजन पाटील यांनी वरील मागणीबद्दल कुठेही सुतोवाच केलेले दिसत नाही. खुद्द बचाव समितीचे लोक आम्ही हे दुष्कृत्य केले नाही असा निर्वाळा देत फिरत आहेत.
विस्तारीकरण व विद्युत प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प सभासदांच्या सूचनेनुसार च पूर्ण केले असून आज भीमा कारखाना साखर उद्योगापुढील विविध संकटांमुळे अडचणीत आला तरी हि बाब सभासद-कामगारांनी समजून घेऊन सहकार्य केले आहे.कारवाईचे बातमीने सभासद कामगारांमधे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो कि काय या भीतीने प्रचंड असंतोष व नाराजी पसरली आहे. बचाव समितीच्या ह्या मंडळीचा हेतू शुद्ध नसून त्यांना राजकीय स्वार्थासाठी सभासद व कामगार यांच्या ताटात कोरोनाच्या नाजूक परिस्थितीमधेसुद्धा माती कालविल्याचे साधे दुःखही त्यांना नाही.आपण दोघांनीही त्यांचा जनाधार व राजकिय प्रगल्भता तपासून पहावी मगच पुढील पाऊल ऊचलावे ही विनंती घेऊन भीमाच्या सभासदांचे शिष्टमंडळ आपल्या भेटीस येईल.
प्रा. संग्रामदादा चव्हाण, संघटक, भीमा परिवार

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here