भीमा नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत व गळती थांबवावी:ज्ञानेश्वर माऊली जवळेकर (बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या जनहितासाठी मागणी)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती असल्याने नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत विशेषता पिराची कुरोली-पट कुरोली व गुरसाळे या बंधाऱ्यावर पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने त्या बंधाऱ्याची पाणी गळती थांबवण्यात यावी व पूर्ण क्षमतेने सदर बंधारे भरून घ्यावेत अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे पत्र कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार,पंढरपूर तालुकाध्यक्ष रामेश्वर झांबरे, युवातालुकाध्यक्ष लखन हाके, शेतकरी शहाजीनाना जगदाळे,सर्जेराव शेळके, अक्षय झांबरे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here