भीमा नदीवरील पाण्याचे बंधारे पुर्ण क्षमतेने आडवावेत अन्यथा उजनी पाटबंधारे अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासू -शिवाजी जाधव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा नदीवरील पाण्याचे बंधारे पुर्ण क्षमतेने आडवावेत अन्यथा अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासन्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला असल्याने सोलापुर जिल्ह्याची वरदाईनी असलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असुन या वर्षी पिन्यासाठी व शेतीसाठी भरपुर प्रमाणात पाणी उपलब्ध होनार असुन या पाण्याचे योग्य नियोजन उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी करावे अन्यथा भरपूर पाऊस पडून ही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण शकते.
सध्य उजनी धरनातुन सोलापुर शहरासाठी व ग्रामीण भागातील शेतीसाठी सहा हजार क्यूसेकने पाणी सोडले असुन त्या पाण्याचे योग्य नियोजन होने गरजेचे आहे, इथून पुढ़े आता उन्हाळा सुरु होनार असुन नदीवरील कोल्हापुर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने न अडविल्यास, बंधारा लीकेज राहिल्यास पाणी लवकर संपल्याने पाणी टंचाई निर्माण होवू शकते त्यामूळे जनावरांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात हाल हाेवू शकते याचा विचार करून उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी बंधारे पूर्ण क्षमतेने अडवुन जनावरांचे व शेतीचे होनारे नुकसान टाळावे अन्यथा अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासन्याचा इशारा जनहित शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी दिला आहे यावेळी राजेंद्र आसबे, पिंटू पवार, पृथ्वीराज भोसले, संदीप पाटील, गोपीनाथ वराडे, शिवाजी सुतार, आन्ना सरवळे, महेश पवार, दीपक भोई, बच्चन भोई, अतुल शिवशरण जनहितचे पदाधिकारी उपास्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here