भीमा कारखान्यात मिल रोलर पुजन सोहळा संपन्न. यंदाच्या हंगामात 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट! -सतीश जगताप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना म्हणजे भीमा सहकारी साखर कारखाना येथे आज मिल रोलर पूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्या शुभहस्ते पूजन संपन्न झाले! यावेळी कारखान्याचे संस्थापक कै. भीमरावदादा महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन सतिश आण्णा जगताप तसेच उपस्थित मान्यवर व जेष्ठ सभासद यांच्या हस्ते करण्यात आले!

हा कार्यक्रम भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर संप्पन्न झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना कारखान्याचे प्रवक्ते श्री पांडुरंग ताठे यांनी 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तर यंदा उजनी धरण शंभर टक्के भरले असून तसेच भीमा कारखाना खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी पुरेशा ऊस तोडणी यंत्रणेसह पूर्णपणे सज्ज असून 10 लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासद कामगार व अधिकारी हे उद्दिष्ट नक्की पूर्ण करू असा विश्वास भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांनी व्यक्त केला.याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे,भीमा परिवाराचे संघटक समन्वयक संचालक दादा शिंदे,बिभिशन बाबा वाघ,सिद्धाम आप्पा मदने,दिलीप उर्फ अनंता रामहरी रणदिवे,संचालक अनिल आगतराव गवळी,चंद्रसेन बापू जाधव,सज्जन चव्हाण,झाकीर मुलानी,अन्सार भाई शेख,शरद जाधव, भरत जाधव,किसन जाधव,राजाराम बाबर,भारत पाटील,विश्वास पांढरे, कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी बंडू साहेब शेख, दिलीप पाटील, भगवान काका बाबर, बाळासाहेब झाडबुके, भाऊसाहेब जगताप, महादेवआबा बाबर,चिफ इंजिनिअर आसबे साहेब, भीमराव वसेकर प्रशांत वसेकर,बर्मा वसेकर,धर्मा वसेकर सुनील वसेकर माऊली वसेकर,सिद्धू बापू अनुसे सरपंच पोपट सोनटक्के जमीर मुजावर,रसूल मुजावर,बंडू अनुसे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here