भीमा कारखान्याची संपूर्ण मोहोळ तालुक्यात अग्रेसर कामगिरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(अंदाजे पाच कोटी रुपयांची वीज महावितरणला निर्यात)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

संपूर्ण मोहोळ तालुक्यातील एकमेव असा सहकारी साखर कारखाना असलेल्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने आजतागायत संपूर्णपणे अंदाजे रक्कम रुपये पाच कोटी रुपयांची वीज(९३ लाख युनिट)महावितरण कंपनीला निर्यात केली असून त्याच प्रमाणे, भीमा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंत दोन लाख 28 हजार गाळप केले असून जवळ जवळ या माध्यमातून त्यांनी दोन लाख सहा हजार साखरेचे उत्पादन केले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याने आपली रिकव्हरी १०.०१ चांगली ठेवली असून कारखाना दररोज कमीत कमी चार हजार क्विंटल उसाचे गाळप करत असून या माध्यमातून सर्व उस तोडणी वाहतूक दारांनी कारखान्याला बहुमोल सहकार्य केले आहे. त्याच बरोबर येणाऱ्या 86032 या उसाला, कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी शंभर रुपये जास्ती देण्याचे घोषित केल्यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला राहिलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सर्व कारखान्याच्या प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी भिमा कारखान्याचे कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब जगताप यांनी केले आहे. यावेळी बंडू साहेब शेख, महादेव आबा बाबर, कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबा गावडे, व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here