भीमाचे चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी घेतली आमदार समाधान (दादा) आवताडे यांचे सदिच्छा भेट! (अनेक विषयावर झाल्या महत्त्वपूर्ण चर्चा,राजकीय वर्तुळात चर्चेला उधान)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्यसभेचे खासदार माननीय धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांचे चिरंजीव भीमा सहकारी साखर कारखान्याचे नूतन युवा चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान (दादा) अवताडे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिली.

मतदार संघाच्या सार्वजनिक कार्यक्षेत्रामध्ये काही धोरणात्मक परिवर्तनासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने झटुन काम वेळेवर व चांगल्या पद्धतीने करता येईल. आज कालची साखर कारखानदारी व त्यासमोर असणारे विविध प्रश्न,अडचणी याबद्दल भीमा सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक व आमदार समाधान (दादा) अवताडे यांच्यामध्ये प्रदीर्घकाळ चर्चा झाली.आमदार समाधान (दादा) अवताडे यांनी नूतन युवा चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक यांना चर्चा करून मार्गदर्शन केले. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील झालेल्या भेटीचे फोटो सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होत आहे.

भीमा परिवाराचे युवा नेते चेअरमन मा.विश्वराज (भैय्या) महाडिक व आवताडे परिवाराचे आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या अशा अचानक भेटीमुळे चर्चा या दोन्ही तालुक्यात चांगलीच रंगत आहे.

यावेळी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ (भाऊ) आवताडे, उद्योजक सत्यजित सुरवसे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here