भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शोभाताई वाघमोडे देशमुख यांचा भाळवणी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी यांचे तर्फे सत्कार संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिल्हा परिषदेतील आपला पाच वर्षाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सौ. शोभाताई वाघमोडे देशमुख व तानाजीराव वाघमोडे देशमुख यांचा भाळवणी चे सरपंच श्री विठ्ठल चौगुले व उपसरपंच सौ पुनम दीपक गवळी यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवानराव चौगुले यांनी मनोगतामध्ये सांगितले की,आज पर्यंतच्या जिल्हा परिषद सदस्य च्या तुलनेत वाघमोडे ताईनी त्यांच्या कालावधीमध्ये भाळवणी गावास भरघोस असा निधी मिळवून दिला . त्याचबरोबर भाळवणी जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांना निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत असे सांगितले.
तानाजी वाघमोडे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते कैलासवासी सुधाकरपंत परिचारक मालक व आमदार प्रशांतराव परिचारक मालक यांच्यामुळे आम्हाला आपल्या गटाची सेवा करण्याची संधी मिळाली, आपणही आम्हाला मोलाचे सहकार्य करून समजून घेतले, पंचायत समिती सदस्य संभाजीराजे शिंदे व सत्यवान देवकुळे यांना विश्वासात घेऊन काम केल्यामुळे कोणत्याही प्रकारची नाराजी न होऊ देता आम्ही भाळवणी गटातील सर्वच गावांना भरघोस असा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळवून दिला, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत., असे सांगितले.
 यावेळी डॉक्टर रेपाळ सर बोलताना म्हणाले की, वाघमोडे ताई आणि तानाजीराव वाघमोडे  यांनी आमचे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष देऊन येथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

यावेळी सहकार शिरोमणी चे संचालक दीपक गवळी, पांडुरंग चे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, शिवसेना नेते प्रवीण शिंदे, डॉक्टर सौ रेपाळ मॅडम, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील ,सचिन कुचेकर अतुल गवळी माजी सरपंच धोंडीराम शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here