भारतीय जनता पक्षाकडुन आ.प्रशांत परिचारकांना उमेदवारी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(मात्र 09मतदार अपात्र!)

सोलापूर // प्रतिनिधी

विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदार आहेत का, याचा आढावा घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील 419 मतदारांपैकी नऊ सदस्य अपात्र ठरले आहेत. विविध कारणास्तव काहींचे सदस्यत्व रद्द झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे.

विधान परिषदेसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या सदस्यांसह पंचायत समित्यांच्या सभापतींना मतदानाचा अधिकार असतो. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक (आबा) साळुंखे यांचा पराभव करून प्रशांत परिचारक यांनी विजय मिळवला होता. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. सोलापूर महापालिकेवर भाजपची सत्ता असून त्या ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, माळशिरस तालुक्‍यातही भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत. विधान परिषदेसाठी जवळपास 300 मतदान आमच्या बाजूचे असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे म्हणाले, तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे जिल्ह्यात जवळपास 110 पर्यंत मतदार आहेत. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरीही स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळीच असतात. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचेच पारडे जड असल्याचे सध्याचे चित्र आहे.

विधान परिषदेसाठी 410 मतदार

विधान परिषदेसाठी 419 मतदारांपैकी नऊजण अपात्र ठरले असून 410 मतदार या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावतील. निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी 75 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान आहे का, यासंदर्भात माहिती घेतली आहे.

– भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), सोलापूर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here