“भारताचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल आणि आयर्न लेडी इंदिराजी गांधी या दोघांचे आदर्श नवीन पिढीने अंगिकारावे” – प्रकाश वाले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

“भारताचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल आणि आयर्न लेडी इंदिराजी गांधी या दोघांचे आदर्श नवीन पिढीने अंगिकारावे. देश सध्या अडचणींमधून वाटचाल करत असताना अशा कणखर नेत्यांचे आदर्शच आपल्याला संकटातून वाचवू शकतील.” अशा शब्दात कॉंग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी भारताच्या माजी पंतप्रधान ‘आयर्न लेडी’ इंदिराजी गांधी आणि ‘पोलादी पुरूष’ सरदार वल्लभभाई पटेल यांना शब्दांजली वाहिली.

आज सोलापूर महानगर पालिकेतील माननीय माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहर कॉंग्रेसतर्फे आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी बोलताना वाले यांनी वरील भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमानंतर कॉंग्रेस भवन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहर कॉंग्रेसतर्फे आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस विश्वनाथ चाकोते, अलकाताई राठोड, प्रदेश सचिव मेकाले गुरुजी, नगरसेवक विनोद भोसले, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, अरुण साठे, बाबुराव म्हेत्रे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती मशाळ, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अप्पासाहेब बगले, रामसिंग आंबेवाले, v.d. गायकवाड, सुनील व्हटकर, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर ,हारून शेख, प्रवक्ते नागनाथ कदम, हाजी मलंग नदाफ, युवराज जाधव, राजन कामत, अनुपम शहा, नुरअहमद नालवार, प्रमिला तुडलवंडे, शोभा बोबे, मोनिका सरकार, राजेश झंपले, रमेश फुले, श्रीकांत दासरी, सत्यनारायण संगा, मेधशाम गौडा, लालु सानी, पंडीत गणेशकर, मुमताज तांबोळी, चंदाताई काळे, वासंती साळुंखे, साकिया बानो बिराजदार, अनिता भालेराव, रुस्तम कंपली, चंद्रकांत टिक्के मिता गायकवाड, रुबिया शेख आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here