भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सोलापूर काँग्रेसच्यावतीने सद्भावना दिवस म्हणून साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सोलापूर काँग्रेसच्यावतीने सद्भावना दिवस म्हणून साजरी

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ‪माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदभावना प्रतिज्ञा घेतली आणि आजचा दिवस सदभावना दिवस म्हणून साजरा केला.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, भारतरत्न राजीव गांधींनी भारतात तंत्रज्ञान, कॉम्पुटर, डिझिटल युग आणले, 18 वर्षाच्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला, पंचायत राज सुरू केले. तसेच २० ऑगस्ट हा जयंती दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. यानिमित्ताने राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर हा कालावधी सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे साजरा करण्यात येईल असेही म्हणाले.

यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी महापौर नलिनीताई चंदेले, नगरसेवक विनोद भोसले, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, हाजीमलंग नदाफ, हारून शेख, सिद्राम अट्टेलुर, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, तिरुपती परकीपंडला, नंदा कांगरे, नारायण पावटे, गोविंद कांबळे, राहुल बोळकोटे, VD गायकवाड, लता गुंडला, सुनील व्हटकर, शोहेब कडेचुर, लक्ष्मीनारायण दासरी, मल्लिनाथ सोलापुरे, राजेश झंपले, मुमताज तांबोळी, संतोषी गुंडे, चांदा काळे, अंजली मंगोडेकर, बसंती साळुंखे, मेघश्याम गौडा, जगदेवी कदम, पंडित गणेशकर, वैशाली गौड, सुरेखा घाडगे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here