भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्र,राजकारणी,त्तत्वज्ञ, यामधील समाजसुधारक होते.त्यांनी दलितबौध्द चळवळीला प्रेरणा दिली.अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे सर्मथन केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु.पूर्वा दौंडे ने उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती दिली.तसेच इयत्ता आठवीतील  पार्थ बिडवे या विद्यार्थ्यांने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर सुंदर गीत सादर केले.तसेच इयत्ता दहावीतील कु.प्राप्ती आलदर या विद्यार्थ्यीनिने बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाबद्दलचे योगदान उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ दहावीतील विद्यार्थी पृथ्वीराज पवारने केले .या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here