भाजपा अनुसूचित जाती प्रदेश त्याचे संघटन मंत्री प्रा. मोहन वनखंडे यांचा मोहोळ भाजपच्या वतीने जाहीर सत्कार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भाजपा अनुसूचित जाती प्रदेश त्याचे संघटन मंत्री प्रा. मोहन वनखंडे यांचा मोहोळ भाजपच्या वतीने जाहीर सत्कार!

 

सोलापूर // प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी अनु .जाती मोर्चा प्रदेश संघटन महामंत्री मा. प्रा. मोहन वनखंडे सपत्नीक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना मोहोळ येथे भाजपाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मोहोळ तालुका मा. अध्यक्ष सतीश (आप्पा) काळे, जेष्ठ नेते मा. पद्माकर (आप्पा) देशमुख, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सोशल मीडिया प्रभारी संजीव खिलारे, अ. जा. मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा. नागनाथ क्षिरसागर, मा. रमेश चव्हाण, मा.रामचंद्र (तात्या) साठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहोळ तालुका व सोलापूर जिल्हा भाजपा पक्ष वाढीच्या अनुषंगाने व अ. जा. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मा. सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील नियोजित जिल्हा व मंडल दौऱ्या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मा. नागनाथ क्षीरसागर यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संघटन महामंत्री प्रा. मोहन लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here