भाजपने राज्यसभेसाठी तिसऱ्या नावाची केली घोषणा! राज्यसभेसाठी भाजपकडून धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

धनंजय महाडिक यांचेही नाव भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज रविवारी (ता.२९) जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता सहाव्या जागेसाठी चुरसीची लढाई पाहायला मिळणार आहे. भाजप व महाविकास आघाडीकडून जोर लावला जाईल. मतांचे गणित पाहिल्यास भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडी जर एकसंध राहिल्यास मित्र पक्षांचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात.

कोल्हापुरात भाजपच्या विस्तारासाठी धनंजय महाडिकांची मदत होऊ शकते, याचा विचार करुन तिसरा उमेदवार म्हणून पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज भाजपने राज्यसभेसाठी पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र पक्षाने शिवसेनेला शह देण्यासाठी अचानक तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here