ब्रिटनच्या महाराणी एलिथाबेथ द्वितीय यांचे निधन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ब्रिटनच्या महाराणी एलिथाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे. बकिंगहॅम पॅलेसने त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल ७० वर्षे राज्य केल्यानंतर, ब्रिटनमधील सर्वात जास्त काळ महाराणी राहिलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी बालमोरल येथे निधन झाले. गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. तेव्हापासून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. राणी काही दिवस स्कॉटलंडमधील बालमोरल वाड्यात होत्या. दर उन्हाळ्यात त्या तेथे जात असत. गेल्या काही दिवसांपासून राणींच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शिवाय त्यांना फेब्रुवारीमध्ये त्यांना कोविड-१९ ची लागण देखील झाली होती.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे राणी एलिझाबेथ यांची त्यांच्या प्रिव्ही कौन्सिलची बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. ट्रस या ९६ वर्षीय राणी एलिझाबेथ यांना भेटण्यासाठी स्कॉटलंडमधील अॅबर्डीनशायर येथील बालमोरल कॅसल या निवासस्थानी पोहोचल्या होत्या.

बकिंगहॅम पॅलेसच्या या बातमीने संपूर्ण देश आता चिंतेत असेल, असे नवनियुक्त पंतप्रधान लिझ ट्रस यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “यावेळी माझ्या आणि संपूर्ण देशाच्या भावना राणी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे ट्विटही पंतप्रधान ट्रस यांनी केले आहे. राणी एलिझाबेथ मृत्यूसमयी ९६ वर्षांच्या होत्या आणि त्यांच्या कारकिर्दीला ७० वर्षे झाली आहेत. अद्याप त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. राणीचे पुत्र अँड्र्यू आणि एडवर्ड व्यतिरिक्त, त्यांची मुलगी प्रिन्सेस अॅन आधीच स्कॉटलंडमध्ये त्यांच्यासोबत आहेत.

राणींच्या तब्येतीबाबत अधिक कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. त्यांना चालताना त्रास होत असल्याचे सांगण्यात येत होते. या वर्षी फेब्रुवारीमध्येच त्यांना कोविड-१९ची लागण झालेली होती.त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. पण या आजाराने त्या खूप अशक्त झाल्या होत्या. पॅलेसने प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये राणीने डाव्या हातात एक काठी धरलेली होती, ज्याच्या मदतीने त्या चालत होत्या. राणी एलिझाबेथ यांची ढासळणारी तब्येत गेल्या काही वर्षांपासून चिंतेचा विषय बनली होती. यामुळे त्यांना त्यांचे काही कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचेही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निधन झाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here