बोले तैसा चाले! मागील गळीत हंगामातील FRP पेक्षा जास्त 50 रू बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा (खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेला शब्द पाळला)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बोले तैसा चाले!

मागील गळीत हंगामातील FRP पेक्षा जास्त 50 रू बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

(खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेला शब्द पाळला)

मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगाम 2021-22 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला एफ आर पी पेक्षा जास्त 50रु देऊ असे खासदार चेअरमन धनंजय महाडिक यांनी जाहीर केले होते.

त्या शब्दाला जागत खासदार धनंजय महाडिक यांनी आजपासून सर्व शेतकरी सभासदांच्या खात्यावर ५०/- रुपयांचा हप्ता वर्ग केला आहे.
अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर सर्व शेतकरी सभासदांना दीपावली सणासाठी, सवलतीच्या दरामध्ये दिनांक 22 ऑक्टोबर पासून साखर वाटप करण्यात येणार आहे यामुळे भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणूकीच्या तोंडावर साखर वाटपास व 50रू च्या बीलास उशीर लागत चालल्यामुळे भीमा परिवारच्या नेता व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते मात्र हे चिंतेचे वातावरण पुर्णपणे निव्वळले असून सर्व कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.

हे दोन्ही विषय सर्वच विरोधकांचे टीकेचे लक्ष सोशल मिडियावर बनले होते. परंतु या दोन्ही मुद्द्यांची पूर्तता झाल्यामुळे विरोधकांना कृतीतून खासदार धनंजय महाडिक यांनी उत्तर दिल्याची सर्वच कार्यक्षेत्रामध्ये चर्चा आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here