कुरुल- कामती -सोहाळे भागातून मा.खा.धनंजय महाडिक यांच्यामागे मोठी ताकद उभी करणार! प्रशांत पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कुरुल- कामती -सोहाळे भागातून मा.खा.धनंजय महाडिक यांच्यामागे मोठी ताकद उभी करणार! प्रशांत पाटील

 

बी पॉझिटिव ही सकारात्मकतेची टॅगलाईन घेऊन भीमा परिवाराचे संघटक-समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण हे भीमा परिवाराची समर्थपणे बाजू मांडत असून नकारात्मकतेने भरलेल्या व महाडिक साहेबांनी डच्चू दिल्यामुळे सूडबुद्धीने पछाडलेल्या तसेच सभासद कामगार यांच्या हिता बाबत सारासार विचार हरवून संस्थाविरोधी कारवायात मग्न होऊन आपण सभासदांमध्ये समर्थन मिळवत आहोत या गैरसमजातच धन्यता मानत असलेली भीमा बचाव समिती प्रा.संग्राम चव्हाण हे महाडिक साहेबांच्या बाजूने फक्त एकटेच लढत आहेत असा खोडसाळपणे गैरसमज पसरवत आहेत. परंतु ते एकटे नसून त्यांच्या भूमिकेला संपूर्ण भीमा परिवाराचा खंबीर पाठिंबा असून कुरुल, कामती,सोहाळे परिसरातून चेअरमन खा. धनंजय महाडिक यांच्या पाठीमागे आम्ही सर्व कुरूलकर एकजुटिने सभासदांची मोठी ताकद आम्ही उभा करत आहोत” असे कुरूलचे युवा नेता तथा स्वर्गीय मारुतीआबा पाटील यांचे नातू श्री.प्रशांतराव पाटील यांनी निक्षुन सांगितले.
ते पुढे म्हणाले श्री. धनंजय महाडिक साहेबांनी जुन्या कारखान्या शेजारीच अख्खा नवा 5000 टनी क्षमतेचा कारखाना तसेच 25 मेगावॅट क्षमतेचा नवा सहविद्युत निर्मिती प्रकल्प उभा केला.त्यापासून मोठा नफा मिळून सभासदांच्या ऊसाला ज्यादाचा दर देता येणार आहे. कारखाना आज अडचणीत असला तरी उद्या अडचणी संपणार आहेत व जिल्ह्यात ऊसाला सर्वोच्च दर देण्याची दानत फक्त धनंजय महाडिक यांच्याकडेच आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही.

चौकट

आमचा सगळा ऊस फक्त ‘भीमा’लाच! हीच कुरुलकरांची भावना!लवकरच तसा ठराव

स्वार्थाने भरलेल्या बचाव समितीच्या पोरकट आरोपांमुळे भीमा कारखाना विनाकारण बदनाम झाला. पैशांचे झालेले काम लांबणीवर पडले.परंतु आम्हा सर्व कुरुलकर, कामतीकर,सोहाळेकरांचा भीमाच्या वजनकाट्या प्रमाणेच भिमा परिवाराचे नेतृत्व खा.धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्यावर पूर्ण विश्वास असून “आपल्या” कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमचा सर्व ऊस फक्त भीमा कारखान्यालाच घालणार! सभासद म्हणून आमचे ते प्रथम कर्तव्य असून आम्ही ते एकजुटिने करून दाखविणार! भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम(दादा) चव्हाण यांच्या विनंतीनुसार गावोगावी सभासदांचा मेळावा बोलवून तसा सभासदांच्या सह्यांनी ऊस फक्त भीमा’लाच घालण्याविषयीचा “निर्धाराच्या ठराव” स्वयंप्रेरणेने संमत करण्याचा निर्णयआम्ही घेत आहोत.
(युवा नेता श्री.प्रशांत पाटील, कुरुल)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here