बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन सादर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन सादर!

 

बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चातील महत्त्वाचे मुद्दे.
(1)एससी एसटी वरती होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात. (2)अ) मागासवर्गीय दि. 07/05 2019 च्या शासन निर्णयानुसार रद्द केलेले 33% आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 17 5 2018 व 5/6/2018केंद्र सरकारच्या दिनांक 15 /6/ 2018 च्या आदेशाप्रमाणे मा. न्यायालयाचा अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीत. ब) मंत्रालयातील अधिनस्त अधिकाऱ्यांनी षडयंत्र करून मागासवर्गीय पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्या वर ॲट्रॉसिटी तसेच आरक्षण आधी नियम कलम अन्वये गुन्हा दाखल करावा. क ) मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी असलेले मागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीय यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब निष्कासित करून मागासवर्गीय मंत्र्याची नियुक्ती करावी.( 3) मागासवर्गीय वरील जातीवादी अत्याचाराच्या केसेस चालवण्यासाठी तालुकास्तरीय न्यायालय निर्माण करावे.( 4 ) मंत्रिगट समितीच्या 2006 चा शिफारशीप्रमाणे ओबीसींना ही पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे.(5) ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मधील आरक्षणासाठी तत्काळ आयोग नेमावा.(6) पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात.(7) ईव्हीएम मशीन बंद न करणाऱ्या लोकशाहीविरोधी सरकारच्या विरोधात.(7) शेतकरी व घरगुती वीज बिल माफ न करणाऱ्या सरकार विरोधात.(8) ओबीसीची जातिनिहाय जनगणना करणाऱ्या जातीवादी सरकारच्या विरोधात. जातीवादी सरकारचा वृद्धांमध्ये हा मोर्चा काढण्यात आला यावेळेस, बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे, मातंग एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष राम भाऊ वाघमारे, बहुजन सत्यशोधक कर्मचारी संघ बापूसाहेब शिंदे, न्यू महाराष्ट्र संपादक महावीर वजाळे, माळशिरस तालुका उपाध्यक्ष दादासाहेब दळवी, लहुजी शक्ती सेना अनिल आरडे माजी सरपंच बबनजी किर्त, नारायण गायकवाड, क्रांतीदीप लोंढे संपादक, लखन वाघमारे महेंद्र शिंदे,सतीश वाघमारे,सचिन झेंडे, दीपक लोंढे, पश्चिम म. सदस्य बहुजन सत्यशोधक संघ अनिल सरवदे, लहुजी शक्ती सेना ता. अध्यक्ष,महादेव गाडे, बापू माने, रवी धोत्रे करकंब अध्यक्ष,लखन वाघमारे,सुरेश वाघमारे,संतोष वाघमारे, समाधान जाधव बाळासाहेब खरात आशिष लोंढे आदर्श लोंढे अन्य बहुजन सैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here