“बळीराजा” च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मा.आण्णासाहेब सुपनवर यांची निवड!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

“बळीराजा” च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मा.आण्णासाहेब सुपनवर यांची निवड!

आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवडी संपन्न झाली बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा तालुक्यातील आण्णासाहेब विठ्ठल सुपनवर यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना सुपनवर म्हणाले की;गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू व बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी गाव तिथे शाखा अशा प्रकारे अहोरात्र पणे कारणार आहोत तसेच सोलापूर जिल्हा माऊली जवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली माझी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल मी आभारी आहे असे सांगितले.

यावेळी माऊली जवळेकर बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांबाबत आवाज उठविण्यासाठी अहोरात्र पणे कर्य करणार आहे वीज बीलासाठी तगादा, कारखानदारांकडून ऊस बील वेळेवर मिळत नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच जिल्ह्यात बळीराजा शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे जवळेकर यांनी सांगितले.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले, सर्जेराव शेळके आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here