बचाव समिती च्या पोरकट मंडळींनी तोंड सांभाळून बोलावे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

एकेरी शिवराळ भाषा खपवुन घेणार नाही तालुक्याची अस्मिता सांभाळा- प्रा संग्राम चव्हाण

 

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभास- दांनी सलग दोन्ही पंचवार्षिकला संचालक मंडळ व चेअरमन खा.श्री.धनंजय महाडिक यांच्यावर विश्वास टाकून कारखान्याच एकहाती कारभार त्यांच्याकडे सोपवला आहे.त्या विश्वासाला पात्र राहत वीस वर्षापासून प्रलंबित. असा “तुम्ही कि मी” या वादात अडकलेले विस्तारीकरण प्रकल्प व विद्युत निर्मिती प्रकल्प पूर्ण केले व अनंत कृत्रिम त्रासाला सामोरे जात सर्व सभासद शेतकऱ्यांची थकीत बिले व कामगारांचे पगार अदा केले आहेत. कारखानाही आता खूप चांगला चालू आहे.परंतु तरीही भीमा बचाव समितीची काही ऊद्धट,नादान व पोरकट मंडळी स्वतःच्या मर्यादा ओलांडत भीमा परिवाराचे नेतृत्व तसेच नेते व कार्यकर्ते यांच्या विषयी सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जाची, संस्कृतीहिन,अर्वाच्च व
एकेरी भाषा वापरून सभासदांमध्ये गैरसमज व एक प्रकारे दहशत पसरवण्याचा तसेच चारित्र्यहननाचा मुद्दामहून प्रयत्न करीत आहेत. हे सर्व आम्ही कायद्याचा मान राखत संयमाने पाहत आलो आहोत. त्यांच्या सर्व मागण्या चेअरमन धनंजय महाडिक यांनी आता पूर्ण केल्या असून आता त्यांच्याकडे विरोधासाठी मुद्दाच राहिलेला नाही असे असताना त्यांनी परिसराचे दैवत स्व.भीमरावदादा महाडिक, स्व.परिचारक यांचा पुतळा उभारणी तसेच भीमा परिवाराचे नेते संसदरत्न खा.धनंजय महाडिक व इतर नेते कार्यकर्ते यांविषयी शिवराळ,अपशब्द वापरून या भागातील लोकांच्या भावना दुखविणे व कायदा हातात घेणे त्वरित थांबवावं ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. अन्यथा नेतृत्वा वर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जर ‘टाकळी सिकंदर चौक स्टाईल’मध्ये त्याचे प्रत्युत्तर दिले तर तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते व होणाऱ्या परिणामांना तेच जबाबदार असतील.याची गंभीर दखल कोथाळे, टाकळी आणि सुस्ते भागातील शिवराळ व बेजबाबदार,अरे-तुरे ची भाषा वापरणाऱ्या पोरकट कार्यकर्त्यांनी घ्यावी व संचालक मंडळाला त्यांचे दैनंदिन कामकाज करू द्यावे.भीमा कारखान्याचे सभासद सुज्ञ आहेत. ते डोळसपणे सर्व घडामोडी पाहत आहेत. निवडणूका शांततेत पार पाडणं ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणीच कोणाला अपशब्द न वापरता निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन भीमा सहकारी साखर कारखान्याचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम दादा चव्हाण यांनी सर्व दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना केले.

 

एकेरी शिवराळ वचिथावणखोर भाषा थांबवा! कायदा व सुव्यवस्था राखा भीमा कारखान्याची निवडणूक तोंडावर आली असून आरोप-प्रत्यारोप होणे सहाजिक आहे. “ऊच्चारावरून विद्वत्ता” कळते. बचाव समितीचे नादान कार्यकर्ते अतिउत्साहाच्या भरात सामाजिक शांततेचे भान विसरून सोशल मीडियावर खालच्या स्तराला जाऊन जबाबदार नेतृत्व व नेते मंडळी बाबत व्यक्तीगत जीवनावर बदनामी कारक,खालच्या स्तराचीअपमानास्पद, शिवराळ,पोरकट,एकेरी व असंसदिय भाषेचा वापर करत घाणेरड्या संस्कृतीचे किळसवाणे प्रदर्शन करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यामुळे परिसरातील लोकांच्या भावना दुखावून परिसरात तणाव निर्माण होत आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते.ही गंभीर बाब मा.पोलिस निरीक्षक मोहोळ तालुका यांचे निदर्शनास आणून देत आहोत.

प्रा.संग्राम चव्हाण,संघटक समन्वयक,भीमा परिवार जिल्हाध्यक्ष,किसान कॉंग्रेस

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here