फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये विभागीय खो खो स्पर्धा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
सांगोला: काल रविवारी फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये पार पडलेल्या सी झोन पुणे या विभागीय पातळीवरील खो -खो स्पर्धेत पंढरपूर येथील कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे च्या संघाने शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला च्या संघावर एक डाव व दोन गुणांनी मात करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले .
सकाळच्या सत्रात फॅबटेक टेक्निकल कॅम्पस चे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते व कार्यकारी संचालक दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे ,फार्मसी चे प्राचार्य संजय बैस ,पब्लिक स्कुल चे प्राचार्य प्रा सिकंदर पाटील , पॉलिटेक्निक चे प्राचार्य व या स्पर्धेचे आयोजक प्रा शरद पवार ,सांगोला तालुका क्रीडा संकुल समितीचे सदस्य भारत इंगवले यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले .
या वेळी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सांघिक भावना, नेतृत्व कौशल्य, तसेच अपयश पचविण्याची ताकद निर्माण होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे भाऊसाहेब रुपनर म्हणाले.
पुणे विभागीय डिप्लोमा महाविद्यालया अंतर्गत १३ डिप्लोमा महाविद्यालयाच्या संघामध्ये खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या . उपांत्य फेरीचे सामने स्व्हेरी पॉलीटेक्नीक पंढरपूर विरुद्ध कर्मयोगी पॉलीटेक्नीक शेळवे आणि शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला विरुद्ध ए जी पाटील पॉलिटेक्निक सोलापूर या संघात पार पडल्यानंतर अंतिम सामना कर्मयोगी पॉलीटेक्नीक शेळवे आणि शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला या दोन तुल्यबळ संघात खेळविण्यात आला . शेवटी विजेत्या व उपविजेत्या संघास चषक व सन्मान पत्रक देऊन संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here