फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सकाळच्या प्रसन्न वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

     जीवनामध्ये शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास महत्त्वाचा असतो. नेहमी निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत असते. योग्य आहार,  शारीरिक व्यायाम व  मानसिक संतुलन या गोष्टींचा सुवर्णमध्य साधण्यासाठी फॅबटेक प्रशालेमध्ये अतिशय शिस्तबद्ध रीतीने योग दिन साजरा करण्यात आला.

      संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर ,मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर ,कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर ,कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेच्या क्रीडांगणावर शिस्तबद्ध योगाचे प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. प्रथम विद्यार्थ्यांना ४  हाऊस मध्ये विभागून बसविण्यात आले.

     यावेळी सातवीतील विद्यार्थी अजय पवार याने योग दिनाबद्दल माहिती व व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. योग एक असा प्रकाश किरण आहे, त्याचे तेज कधी ही मावळत नाही जितका सराव करावा तो तितका तेजस्वी होत जाईल. क्रीडा शिक्षक श्री पंचाक्षरी स्वामी यांनी  प्रात्यक्षिके दाखवून प्राणायामाचे विविध प्रकार आणि व्यायामाचे सर्व प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या योग दिनामध्ये प्रशालेतील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here