फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये  वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: फॅबटेक  एज्युकेशन सोसायटी  पुणे  संचलित, फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी व पॉलिटेक्निक या सर्व विद्याशाखांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा. श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने  करण्यात आली. यावेळी फॅबटेक  टेक्निकल कॅम्पस मधील सर्व विद्याशाखांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.

      दिनांक ३१ मे  ते ४ जून  या ५ दिवसाच्या कालावधीत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये  डे सेलिब्रेशन- बेस्ट फ्रेंड फॉरवेअर डे, मिस मॅच डे, बलून सफर गेम, फेस पेंटिंग स्पर्धा, दम शरस गेम, सारी-कुर्ता डे, भीती पत्रिका, स्केच, कविता, रांगोळी स्पर्धा, आर्ट गॅलरी- पोस्टर प्रदर्शन, भित्ती पत्रिका, फूड स्टॉल, फणी गेम्स, फिश पॉंड्स, सिंगिंग, नाटक डान्स तसेच पारंपरिक दिन यामध्ये विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले होते. मुलांनी फेटा, धोतर तर मुलींनी नववारी साडी परिधान केली होती. या पाच दिवसामध्ये  कॅम्पसमध्ये अतिशय उत्साही   वातावरण  झाले होते. याबरोबरच कॅम्पसमध्ये खेळांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या यामध्ये क्रिकेट,खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, चेस, कॅरम, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी क्रीडा स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडल्या.

   या स्नेहसंमेलनाच्या सांगता समारोपप्रसंगी  व्यासपीठावर  संस्थेचे चेअरमन मा  श्री भाऊसाहेब रुपनर, त्यांच्या सुविद्य पत्नी  सौ. सुरेखा रुपनर,कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, सांगोला पोलीस स्टेशनचे एस आय  खिलारे साहेब,सूर्योदय परिवाराचे प्रमुख अनिल इंगोले, मेडशिंगी गावचे प्रा. सुनील नष्टे, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

   या कार्यक्रमाठी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन. जगताप,प्रा.डॉ.नरेंद्र नार्वे  सर्व विभागाचे विभाग प्रमुख,  सर्व प्राध्यापक  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  हा  कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सांस्कृतिक समन्वयक प्रा. अमोल मेटकरी व त्यांचे सहकारी, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here