फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांना आदरांजली अर्पण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणा निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या हस्ते स्व. बिरासाहेब रुपनर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन. जगताप, प्रा. डॉ. एन जी नार्वे,प्रा.डॉ. तानाजी धायगुडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल थोडक्यात माहिती दिली.या कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार प्रा. अमोल पोरे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here