फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  बी  फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला येथिल  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शै. वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष बी फार्मसी  विद्यार्थ्यांचे स्वागत  मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती यांच्या  फोटो पूजनाने करण्यात आली. या  कार्यक्रमासाठी उपस्थित  संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर,  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस व  डी फार्मसी विभागाचे विभागप्रमुख प्रा. सर्फराज काझी यांच्या हस्ते करण्यात आला.

      महाविद्यालयाच्या वतीने व द्वितीय वर्षींतील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी बोलताना  मा.श्री. भाऊसाहेब रुपनर म्हणाले कि, औषधनिर्माण शास्त्र हे एक खूप मोठे क्षेत्र आहे.जगात भारतातून २० टक्के जेनेरिक औषधे निर्यात होतात.तसेच लस निर्मिती क्षेत्रात भारत अग्रेसर आहे.जगातील पहिल्या दहा कंपन्यांमध्ये पाच कंपन्या ह्या फार्मासिच्या आहेत. फार्मासिस्ट हा पडद्यामागचा डॉक्टर असतो. आपण आपल्या कॅम्पसमधून अनमोल असे ज्ञान घेऊन जाणार आहात तसेच एक चांगला फार्मासिस्ट म्हणून समाजामध्ये नाव कमवावे असे सांगून विद्यार्थ्यांना भावी करिअरसाठी त्यांनी  शुभेच्छा दिल्या. तुम्ही व तुमच्या पालकांनी प्रवेश घेताना अतिशय चांगला निर्णय घेतला असून औषधनिर्माण शास्त्र हे अतिशय वेगाने वाढणारे क्षेत्र असून यामध्ये करिअरच्या खूप मोठ्या संधी असल्याचे सांगून सर्व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी अभिनंदन केले.

    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस म्हणाले कि, सध्याच्या परिस्थितीमध्ये टीसीएस व कॉग्निजेंट सारख्या आयटी कंपन्यांमध्ये देखील फार्मासिस्टना अनेक नोकरीच्या संधी भेटत आहेत तसेच भविष्यात देखील हे प्रमाण वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. फार्मसी या अभ्यासक्रमाबद्दलची  सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देऊन सर्व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रा. सर्फराज  काझी, प्रा. अमोल पोरे, प्रा.श्रीनिवास माने यांनीदेखील प्रथमवर्ष  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप विद्यार्थिनी सहारा चव्हाण यांनी  केले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here