फॅबटेक कॉलेजच्या डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल उत्कृष्ट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला येथील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत फॅबटेक कॉलेजच्या डी. फार्मसीच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल ८० टक्के लागला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली.

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये शै.वर्ष २०१९-२० पासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या डी.फार्म व बी.फार्म या विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या निकालामध्ये प्रथम वर्ष कु. यशश्री चव्हाण ही विद्यार्थिनी ७९.०० % गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कु. पूजा सपताळ ७७.६० % गुणांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तर कु. मेघरानी कदम ७७.०० % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. द्वितीय वर्ष निकालामध्ये कु.धनश्री जाधव ८८.०० % प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, कु. सुप्रिया काशीद ८२.०० % गुणांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण तर कु.यळसंगी मीनाक्षी ७८.६० % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here