फॅबटेक उद्योग समूहाचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम डॉ मधुकर कुंभारे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक उद्योग समूहाचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम डॉ मधुकर कुंभारे

(मंगळवेढ्यात फॅबटेक सिटी स्कॅन सेंटर सुरू!)

सोलापूर // प्रतिनिधी

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नव्याने सुरू झालेल्या फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ.मधुकर कुंभारे व निमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे डॉ.सुरज रुपनर, डॉ.सुरेश होनमाने, डॉ.एल.व्ही मर्दा, डॉ.रामानुज मर्दा, डॉ.कोरुलकर,डॉ.समाधान टकले, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे डॉ.सुरज रुपनर म्हणाले की, संत दामाजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढा नगरी मध्ये शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांना सिटीस्कॅन तपासणी करता येणार आहे.
या सिटीस्कॅन तपासणी मध्ये विविध आजारावरील निदान केले जाईल यामध्ये मेंदूचे स्कॅन तसेच मेंदू मधील रक्तस्त्राव, मेंदूवरील सूज, डोक्यात झालेली इंजुरी व ब्लड या सर्व गोष्टी चे निदान होणार आहे.

त्याचबरोबर छातीचे स्कॅन करता येणार असून दम लागणे किंवा छातीमध्ये जर एखादी गाठ असेल तर त्याचे स्कॅन करून निदान करण्यात येईल.
पोटाचे विविध आजार व विकार असतील तर त्याचे देखील स्कॅन मध्ये निदान करता येणार आहे.
सध्या सर्वत्र कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी रुग्णांना आवश्यक असणारी एच आर सि टी तपासणी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे.
मंगळवेढा येथील धर्मगाव रोड वरील दुधाळे कॉम्प्लेक्स नजिक रुग्णांच्या विविध आजारावरील निदानाकरिता फॅबटेक सिटी स्कॅन सेंटर च्या माध्यमातून 24 तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी त्यांच्या आजारावरील निदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुरज रुपनर (एमडी, रेडिओलॉजिस्ट) यांनी केले आहे. याप्रसंगी मंगळवेढा शहरातील मान्यवर डॉक्टर मंडळी, वकील आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here